प्रदर्शन
प्रदर्शन

पशू-पक्ष्यांच्या विविध जातींनी वेधले लक्ष

जालना : उद्योगनगरी जालन्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील पशुधन एक्स्पो २०१९ ला दुसऱ्या दिवशीही उदंड प्रतिसाद मिळाला. देशभरातील गायी, म्हशी, अश्व, शेळी, मेंढी, कुक्कुटपक्षी यांच्या अनेकविविध जाती शेतीला पूरक पर्यायाचा शोध घेणाऱ्या शेतकरी व पशुपालकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या. अत्यंत चिकित्सकपणे शेतकरी माहिती जाणून घेताना दिसले. सोमवारी (ता. ४) प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. सोमवारी प्रदर्शनाच्या समारोपाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. दुसऱ्या दिवशीपासून प्रदर्शनात सहभागी पशू-पक्षी धनांपैकी उत्तम दर्जाची पशूंची गटवाईज निवड करण्याची प्रक्रिया सुरू होती. उत्तम दर्जाच्या पशूंचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली. कोहिनूर रेडा, हुशार मेंढ्या आणि तरतरीत घोडे.. पहा Video  

सतरा जातींच्या गायी प्रदर्शनात गायीच्या १७ जाती सहभागी झाल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने देवणी, खिलार, लालकंधार, डांगी, गवळाऊ, जर्शी, एचएफ, कोकण कपिला, गीर, साहिवाल, राठी, काँक्रीज, हरियानवी, केरळची ठेंगणी वेंचूर, पुंगानूर, ओंगल, हळीकट आदी जातींच्या गायीचा समावेश आहे. २० ते २२ लिटरपर्यंत दूध देणाऱ्या साहिवाल, गीर गायी सर्वांच्या आकर्षण ठरल्या आहेत. म्हशीच्या आठ जाती देशात प्राधान्याने गणल्या जाणाऱ्या म्हशीच्या आठ जाती प्रदर्शनात सहभागी आहेत. त्यामध्ये मुऱ्हा, जाफराबादी, पंढरपुरी, म्हैसाळ, नागपुरी, मराठवाडी, पुरनाथडी, नीलिरावी आदींचा प्राधान्याने उल्लेख करावा लागेल. २९ लिटरपर्यंत प्रतिदिन दूध देणाऱ्या म्हशींची जात प्रदर्शनाचे आकर्षणच आहे. वराहच्या तीन जाती महाराष्ट्रात प्राधान्याने दिसणाऱ्या वराहाच्या अंगोडा गोआन, यार्कशायर व गावठी अशी वराहाच्या तीन प्रकार आहेत. उत्तर भारतात वरहपालन करण्याकडे कल वाढलेला दिसतो. निर्यातीची मोठी संधी असलेल्या या पूरक व्यवसायाकडे अनेकांना वळता येईल ते कसे याची माहितीही प्रदर्शनातून दिली जात आहे. काठेवाडी, मारवाडी, गावठी अश्वपालन व त्यामधील संधी पाहता अश्वांच्या काठेवाडी, मारवाडी, गावठी या तीन प्रमुख जातीचे ५२ अश्व सर्वांचे लक्ष वेधत आहेत. ३२ जातींचे कुक्कुटपक्षी प्रदर्शनात ३२ जातींचे कुक्कुटपक्षी सहभागी झाले आहेत. त्यामध्ये वनराज, गिरिराज, कडकनाथ, करीन निर्भीड, कावेरी, ग्रामप्रिया, रेनबो रुस्टर, आरआरआय, सातपुडा, ब्लॅक अट्रालाप, अशील, ब्रह्मा, देशी बिव्ही ३८०, ३००, जापनिज क्वेल (बटेर) आदी कुक्कुट पक्ष्याचा समावेश आहे. लो इनपुट टेक्नॉलॉजीच्या ७ ते ८ किलोपर्यंत वजन सात ते आठ महिन्यांत होऊ शकणाऱ्या ब्रह्मा जातीचे कुक्कुट पक्षी यामध्ये मुख्य आकर्षण आहेत. शेळ्या-मेंढ्याही वेधताहेत लक्ष एका वेळी एकापेक्षा जास्त करडे देण्याची क्षमता, दुधाचे ब्रीड म्हणून ओळख असलेली जमनापरी शेळी, मांस आणि काटक असलेली उस्मानाबादी, संगमनेरी, शिरोही, बेरारी, कोकण कन्याळ, बिटल, बार्बेरी, आफ्रिकन बोर, आफ्रिकन बोअर अधिक उस्मानाबादी क्रॉस, बेल्टम, तोतापुरी, सोजत, कोटा, गावठी शेळ्यांचे अस्सल वाण प्रदर्शनात आहे. वळू , रेडे आकर्षण प्रदर्शनात खिल्लार, गीर आदीचे वळू, हरियानाचा १६०० किलोचा सुलतान नामक रेडा, १५०० किलो वजनाचा युवराज रेडा, पंजाब पाकिस्तान सीमा भागातील नीलरावी जातीचा कोहिनूर रेडा प्रदर्शनात भाव खाऊन जाताना दिसतो आहे. आदित्य ठाकरेंची भेट शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज(ता. ३) महा पशुधन एक्स्पो २०१९ ला भेट दिली. राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार रावसाहेब दानवेंचीही या वेळी उपस्थिती होती. पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप यांच्याकडून श्री. ठाकरे यांनी प्रदर्शनाविषयी माहिती जाणून घेतली. जालना :  पंजाबहून आलेला कोहिनूर रेडा..

जालना : वेंचुर जातीची केरळ मधील ठेंगणी गाईची जात(उंची अडीच ते तीन फूट ) महा पशुधन एक्स्पो आकर्षण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com