agriculture news in marathi, Anjani lake dry During monsoon | Agrowon

पावसाळ्यातही अंजनी तलाव कोरडा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 जुलै 2018

सावळज, जि. सांगली ः पूर्व भागात सावळजसह काही गावांत पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष चालू आहे. सावळज, अंजनी, वडगाव, नागेवाडी, लोकरेवाडी, गावांना अंजनी तलावातून पाणीपुरवठा होतो. हा तलाव ७४ :१४ द.ल.घ.फु. क्षमतेचा आहे. हा तलाव मार्चपासून कोरडा आहे. तलावातून गावांना होणारा पाणीपुरवठा ठप्प आहे. परिणामी, नागरिकांसह जनावरांच्या चारा-पाणीप्रश्न उभा आहे. काही गावांत ग्रामपंचायती स्वतःच्या तर खासगी बोअरने पाणीपुरवठा करीत आहेत.

सावळज, जि. सांगली ः पूर्व भागात सावळजसह काही गावांत पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष चालू आहे. सावळज, अंजनी, वडगाव, नागेवाडी, लोकरेवाडी, गावांना अंजनी तलावातून पाणीपुरवठा होतो. हा तलाव ७४ :१४ द.ल.घ.फु. क्षमतेचा आहे. हा तलाव मार्चपासून कोरडा आहे. तलावातून गावांना होणारा पाणीपुरवठा ठप्प आहे. परिणामी, नागरिकांसह जनावरांच्या चारा-पाणीप्रश्न उभा आहे. काही गावांत ग्रामपंचायती स्वतःच्या तर खासगी बोअरने पाणीपुरवठा करीत आहेत.

एकीकडे पर्जन्यअभाव व दुसरीकडे म्हैशाळचे तलावात टाकण्यात येणारे पाणी थकीत बिलपोटी दीर्घकाळ बंद आहे. परिणामी, तलावात पाणी कुठून येणार हा प्रश्न आहे. पावसाअभावी भागात जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाळला कडबा विकत घेऊन जनावरांना घालावा लागत असल्याने शेतकऱ्यांना ऐन पावसाळ्यात भुर्दंड बसत आहे. केवळ ७ किमी अंतरावर असणाऱ्या गव्हाण बंधाऱ्यात म्हैशाळचे वारंवार पाणी सोडण्यात येते. मात्र अंजनी तलावात पाणी सोडण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

जनावरांचा प्रश्‍न गंभीर
गव्हाण भागातील शेतीला मुबलक पाणी मिळत आहे, तर दुसरीकडे सावळज पूर्व भागात पाण्यासाठी संघर्ष करीत आहेत. अद्याप एकदाही म्हैशाळचे पाण्याने तलाव अर्धाही भरण्यात आलेला नाही. त्यामुळे सावळज पूर्व भागात पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चारा, पाणीप्रश्न डोके वर काढत आहे.

अंजनी तलावातून अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा होतो. परंतु तलाव कोरडा असल्यामुळे पाणीपुरवठा ठप्प आहे. गव्हाण बंधाऱ्यातून अंजनी तलावात म्हैशाळचे पाणी टाकून तलाव भरावा. थकीत बिल शासनाने भरावे.
- अनिल शिंदे, माजी शिवसेना, तालुका प्रमुख, तासगाव


इतर ताज्या घडामोडी
सांगली जिल्ह्यातील भाजीपाला पिके...सांगली ः सांगली जिल्ह्याची ओळख भाजीपाला...
सणासुदीत निष्काळजीपणा नको ः पंतप्रधान...नवी दिल्ली ः देशातील लॉकडाउन संपला तरी कोरोनाचा...
कांदा बियाण्यांचा काळाबाजार सुरूचनाशिक : मागील वर्षी उन्हाळ कांदा बीजोत्पादनावेळी...
लाचखोर तलाठ्यास कारावासवर्धा : सातबारावरील चूक दुरुस्तीसाठी पंधरा...
‘गोकूळ’ देणार दूध संस्‍थांना दरफरकापोटी...कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध...
केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे ३०...मुंबई : कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक...
बिहारला मदत, मग महाराष्ट्राला का नाही?...मंगळवेढा, जि. सोलापूर : केंद्र शासनाने बिहारमध्ये...
शेतकऱ्यांशी सरकारला देणेघेणे नाही ः...करमाळा, जि. सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे...
पिकांचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने...सोलापूर : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनाला...
सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ७५ महसूल...सोलापूर :  जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा...
सांगली जिल्ह्यात कृष्णाकाठावरील कृषिपंप...सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली...
रत्नागिरीत भातशेतीवर अस्मानी संकटरत्नागिरी : ‘‘ऑक्टोबर महिन्यातील मुसळधार...
नाशिक जिल्ह्यात मका विक्रीत...येवला, जि. नाशिक : सध्या बाजार समित्यांसह खासगी...
नुकसानपातळी अधिक, केंद्रानेही मदत करावी...नाशिक : ‘‘परतीच्या पावसामुळे कापणी योग्य झालेली...
रिसोड तालुक्यात सोयाबीनची हेक्टरी अडीच...रिसोड, जि. वाशीम ः  सततच्या पावसाने सोयाबीन...
सातारा जिल्ह्याला पावसाने झोडपलेसातारा ः दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी...
नुकसानग्रस्तांना अधिकाधिक लाभ द्या :...भंडारा : ‘‘अतिवृष्टी व अवेळी आलेल्या...
नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांची डाळिंब...नगर : दुष्काळ आणि यंदा अतीवृष्टी, तेल्या आणि...
पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : जिल्ह्यात पावसाच्या कमी अधिक स्वरूपात पाऊस...
मराठवाड्यात पीकविमा, नुकसानभरपाई मान्य...नांदेड : ‘‘जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात...