‘इस्मा’च्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षपदी अंकिता पाटील 

Ankita Patil, Co-Chair of ISMA Legal Committee
Ankita Patil, Co-Chair of ISMA Legal Committee

पुणे ः देशात साखर उद्योगामध्ये अग्रेसर असलेल्या नवी दिल्ली येथील इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) या संस्थेच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षपदी अंकिता हर्षवर्धन पाटील यांची निवड झाली आहे.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (इस्मा) देशातील सहाशे पन्नासहून अधिक सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील कारखानदार सदस्य आहेत. देशातील सर्वांत जुनी औद्योगिक संस्था म्हणून ‘इस्मा’ची ओळख आहे. देशातील साखर उत्पादकांचा फायदा आणि हित साधण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करून प्रश्न सोडविण्याचे काम ही संस्था करीत आहे. 

देशातील सहकारी साखर कारखाने आणि आँल इडिया शुगर ट्रेड असोसिएशन यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘इस्मा’ ही संस्था प्रभावीपणे काम करीत आहे. इस्मा नियमितपणे भारतीय साखर उत्पादनाच्या संदर्भातील आकडेवारी प्रसिद्ध करण्याचे काम प्रभावीपणे करीत आहे. 

पाटील यांच्या निवडीबद्दल साखर उद्योग व इंदापूर तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे. पाटील या ऑल इंडिया शुगर मिल्स असोसिएशनच्या देशातील सर्वांत तरुण व एकमेव महिला सदस्या आहेत. तसेच त्या जिल्हा परिषदेच्या सदस्या ही आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com