agriculture news in marathi, Anna Hazare ends fasting after goverments written | Agrowon

मागण्या मान्य, लेखी आश्वासनानंतर आण्णांचे आंदोलन मागे

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

राळेगणसिद्धी, जि. नगर : लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीसाठी गेल्या सात दिवसांपासून राळेगणसिद्धी (जि. नगर) येथे उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण सोडावे यासाठी मंगळवारी (ता. ५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह राळेगणसिद्धीत आले होते. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांच्या लेखी आश्वासनानंतर आण्णा हजारे यांनी आपले उपोषण मागे घेतले.

राळेगणसिद्धी, जि. नगर : लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीसाठी गेल्या सात दिवसांपासून राळेगणसिद्धी (जि. नगर) येथे उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण सोडावे यासाठी मंगळवारी (ता. ५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह राळेगणसिद्धीत आले होते. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांच्या लेखी आश्वासनानंतर आण्णा हजारे यांनी आपले उपोषण मागे घेतले.

तब्बल सहा तासांपेक्षा अधिक काळ चर्चा सुरू होती.  लोकपाल नियुक्ती; शेतकऱ्यांच्या मागण्यांना सरकारने मान्यता दिली आहेत. यात कृषिमूल्य आयोगला स्वायत्तता, नाशवंत शेतमालासाठी अभ्यासासाठी समिती आदी  विषय आहेत.

संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष शिवकुमार शर्मा, आदर्श गाव योजना संकल्प व प्रकल्प समितीचे अध्यक्ष पोपटराव पवारही हजर होते.

लोकपाल व लोकायुक्ताची नियुक्ती करावी, यांसह शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांच्या गावी राळेगणसिद्धी येथे यादवबाबा मंदिरात ३० जानेवारीपासून अमरण उपोषण सुरू केले आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यासोबत सोमवारी रात्री चर्चा केली; पण मागण्याबाबत समाधान झाले नसल्याने अण्णांनी उपोषण सुरूच ठेवले. सरकार दखल घेत नसल्याचा आरोप करत राळेगणच्या ग्रामस्थांसह जिल्हाभर कालपासून आंदोलनाची धग वाढत होती. अण्णांच्या उपोषणाचा मंगळवारी सातवा दिवस असल्याने त्यांचे वजन पाच किलो शंभर ग्रॅमने घटले आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी. एम. मुरंबीकर यांनी सांगितले. त्यांची प्रकृती ढासळत होती. 

मंत्रिगण दाखल होण्यापूर्वी प्रशासनाने दक्षता पाळत कोणालाही माहिती दिली नाही. पावणेतीन वाजता मागण्यांवर अण्णांसोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अन्य मंत्री, पोपटराव पवार यांनी मागण्यावर बंद खोलीत चर्चा केली. रात्री सात वाजेपर्यंतही चर्चा सुरूच होती. त्यामुळे उपोषणावर रात्री उशिरापर्यंत तोडगा निघाला नाही. मात्र अण्णाच्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. केवळ स्वामिनाथन समितीच्या मुद्द्यावर अडले होते, असे सांगण्यात आले.


इतर अॅग्रो विशेष
व्यवसाय स्वातंत्र्यावर गदा नकोचशेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याबाबतची एक चळवळ...
क्रयशक्ती वाढविणारा हवा अर्थसंकल्पकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी...
कमी फॅटचे दुध पिल्यास म्हतारपण कमी होतं...कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास...
विदर्भ, कोकणात आज हलक्या पावसाचा अंदाज पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांअभावी राज्यात थंडी...
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत ५७...नाशिक : राज्यातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत...
दूध उत्पादक महत्त्वाचा दुवा: हरिभाऊ...औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या एकूणच...
अर्जेंटिनाला होणार आंबा निर्यात पुणे : कोकणातील हापूस आणि मराठवाड्यातील केशर...
गावरान अळूची फायदेशीर व्यावसायिक शेतीसुमारे पंधरा गुंठ्यांत देशी गावरान अळूची शेती...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
‘पोकरा’ प्रकल्पात कृषी यांत्रिकीकरणाचे...अकोला  ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंडकुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...