अण्णा आंदोलनाच्या निर्णयावर ठाम 

‘‘अण्णा, तुमचे वय पाहता तुम्ही उपोषण करू नये. त्याऐवजी धरणे किंवा मौन आंदोलन करावे,’’ अशी विनंती आदर्श सरपंच पोपटराव पवार यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना केली आहे.
अण्णा आंदोलनाच्या निर्णयावर ठाम Anna insists on the decision of the movement
अण्णा आंदोलनाच्या निर्णयावर ठाम Anna insists on the decision of the movement

नगर : ‘‘अण्णा, तुमचे वय पाहता तुम्ही उपोषण करू नये. त्याऐवजी धरणे किंवा मौन आंदोलन करावे,’’ अशी विनंती राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना केली आहे. या वेळी हजारे यांनी, ‘‘आपण आंदोलनावर ठाम असून, शेतकरी हितासाठी व मागण्यांसाठी मी मरण पत्करण्यास तयार आहे.’’ असा निर्वाणीचा इशारा अण्णांनी पुन्हा केंद्र सरकारला दिली आहे. 

स्वामिनाथन आयोग लागू करावा. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळावा. शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव मिळावा. या शिवाय शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथील यादव बाबा मंदिरात हजारे उपोषण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पवार यांनी त्यांची भेट घेऊन मन वळविण्याचा प्रयत्न केला.

अण्णाही म्हणणार, ‘लाव रे तो व्हिडिओ’ ‘‘२०११मध्ये उपोषण केले, तेव्हा भाजप नेते माझ्या आंदोलनाचे कौतुक करीत होते. आता त्यांच्याकडून एकाही पत्राचे उत्तर आलेले नाही. रामलीला मैदानावर आंदोलनासाठी चार वेळा पत्रव्यवहार केला, तरीही परवानगी नाकारली. त्यामुळे आता भाजप नेत्यांचे शेतकऱ्यांच्या भूमिकेबाबत व कौतुकाचे व्हिडिओ जनतेला दाखविणार आहे,’’ असेही अण्णा हजारे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com