नगर ः कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून गेल्या वर्षभरापासून नवीन शेततळ्याची का
बातम्या
अण्णांनी उपोषण करू नये : फडणवीस
अण्णा हजारे यांनी शेती प्रश्नावर उपोषण करणार असल्याचे जाहीर केल्यावर केंद्रीय कृषिमंत्र्याचा निरोप घेऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी भेट घेऊन उपोषण न करण्याची विनंती केली.
राळेगणसिद्धी, जि. नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेती प्रश्नावर उपोषण करणार असल्याचे जाहीर केल्यावर केंद्रीय कृषिमंत्र्याचा निरोप घेऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी भेट घेऊन उपोषण न करण्याची विनंती केली. हजारे यांनी मात्र सरकार आश्वासने पाळत नाही, त्यामुळे ठोस निर्णयाशिवाय उपोषण थांबविणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमालाला हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तत्ता मिळावी आदी मागण्यांसाठी ३० जानेवारीपासून हजारे यांनी राळेगणसिद्धीत उपोषण करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जाहीर केले आहे. त्यानंतर शुक्रवारी (ता. २२) सायंकाळी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हजारे यांची भेट घेऊन
चर्चा केली.
फडणवीस म्हणाले, ‘‘केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांचा निरोप घेऊन मी हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी उपस्थित केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंर्भातील नऊ मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून ते समजून घेतले. अण्णांच्या मागण्या केंद्रापर्यंत पोहोचवू.’’
- 1 of 1548
- ››