agriculture news in marathi, Annadata agitate against government farmers policies | Agrowon

आश्‍वासनपूर्ती न केल्याने ‘अन्नदाता’चे आंदोलन
टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 जून 2018

औरंगाबाद : शेतकऱ्यांना दिलेल्या आश्‍वासनाची पूर्ती न करणाऱ्या शासनाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत अन्नदाता शेतकरी संघटनेने रविवारी (ता. ३) फसवणूक दिवस पाळला. यानिमित्त केंद्र व राज्य शासनाविरोधात येथील क्रांती चौकात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

औरंगाबाद : शेतकऱ्यांना दिलेल्या आश्‍वासनाची पूर्ती न करणाऱ्या शासनाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत अन्नदाता शेतकरी संघटनेने रविवारी (ता. ३) फसवणूक दिवस पाळला. यानिमित्त केंद्र व राज्य शासनाविरोधात येथील क्रांती चौकात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

शेतकऱ्यांसह अन्नदाता शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात या आंदोलनात सहभाग घेतला. गतवर्षी १ जूनला पुकारलेल्या शेतकरी संपानंतर राज्य शासनाने संपाची हाक देणाऱ्या शेतकऱ्यांच्या कोअर कमिटीसोबत चर्चा केली. कोअर कमिटीला दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता एक वर्ष लोटूनही शासनाने केली नाही, अशी टीका श्री. सूर्यवंशी यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केल्याने ३ जून हा फसवणूक दिवस म्हणून साजरा करत असल्याचे सांगत शेतकरी व अन्नदाता शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

आपल्या मागण्यांसाठी पुन्हा शेतकऱ्यांनी १ जूनपासून संपाचे हत्यार उपसले आहे. शासनाने त्याची दखल न घेतल्यास राज्यात मोठा उद्रेक होण्याची शक्‍यताही सूर्यवंशी यांनी व्यक्‍त केली. 

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...