जनावरांच्या शरीरावरील गोचिड निर्मुलन करण्यासाठी ग्रामीण पातळीवर सहज उपलब्ध होईल, अशा औषधी
ताज्या घडामोडी
अण्णांचे दिल्लीऐवजी राळेगणसिद्धीत आंदोलन
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषण करण्यासाठी चार वेळा पत्रव्यवहार करूनही दिल्ली प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यामुळे आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे महात्मा गांधी पुण्यतिथीपासून (ता. ३०) राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरातच उपोषण सुरू करणार आहेत.
नगर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषण करण्यासाठी चार वेळा पत्रव्यवहार करूनही दिल्ली प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यामुळे आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे महात्मा गांधी पुण्यतिथीपासून (ता. ३०) राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरातच उपोषण सुरू करणार आहेत. हजारे यांचे स्वीय सहायक संजय पठाडे यांनी ही माहिती दिली.
अण्णांनी उपोषण करणार असल्याचे जाहीर केल्याने आता केंद्र सरकार काय भूमिका घेतेय हे पाहणे महत्त्वाचे आहे. अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी केंद्र सरकारला उपोषणाचा इशारा दिल्यानंतर भाजप नेत्यांनी राळेगणसिद्धीच्या वाऱ्या सुरू केल्या होत्या. मात्र चर्चा नको; ठोस कार्यवाही करा, असे सांगत हजारे उपोषणावर ठाम होते. याआधी केलेल्या उपोषणाच्या वेळी दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही आणि केंद्र सरकार पत्रालाही उत्तर देत नसल्याचे हजारे यांचे म्हणणे आहे. त्यातच आता कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी नवी दिल्लीच्या सीमांवर पावणेदोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे.
केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव नाही आणि शेतकऱ्यांची दखलही घेतली जात नसल्याचे सांगत हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषण करण्यासाठी चार वेळा पत्रव्यवहार करूनही दिल्ली प्रशासनाने परवानगी दिलेली नाही.
- 1 of 1055
- ››