शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरजः अण्णासाहेब मोरे 

agri festival
agri festival

नाशिक : देशातील कृषी व ऋषी संस्कृतीमध्ये काळ्या आईची सेवा करणारा शेतकरी हा देवांपेक्षाही मोठा आहे. मात्र, त्याच्या वाढणाऱ्या आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे. त्या थांबविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे व श्री स्वामी समर्थ कृषी विकास संशोधन चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केले. 

श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी यांच्या वतीने गुरुवारी (ता.२३) आयोजित ‘जागतिक कृषी महोत्सवा’च्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, देवयानी फरांदे, सीमा हिरे, नगरसेविका वत्सला खैरे, भागवत आरोटे, स्वाती भामरे, मधुकर जाधव, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, प्रा. नामदेवराव जाधव, नगर रचना विभागाच्या सहसंचालक प्रतिमा भदाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, आत्मा नाशिकचे प्रकल्प उपसंचालक कैलास शिरसाठ, हेमंत काळे, आयोजक आबासाहेब मोरे यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

श्री. मोरे म्हणाले, की शेती क्षेत्रात होणारे बदल हे नव्या युगाचे आव्हान आहे. शेती ही शाश्वत करण्यासाठी सर्वांगीण पातळीवरून काम उभे करावे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हंगामनिहाय नियोजन, बियाणे निवड, लागवडपद्धती, काढणीपश्चात तंत्रज्ञान व विपणन या विषयावर मार्गदर्शन व चर्चा व्हावी. त्यातूलच गाव पातळीवर शेतीच्या बांधापर्यंत जाईल. 

आमदार फरांदे म्हणाल्या, की शेतकरी जगाला, तर देश मोठा होईल. नाशिक हा प्रगतिशील व प्रयोगशील जिल्हा कृषी क्षेत्रात पुढारलेला आहे. जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध होण्यासाठी अशा उपक्रमाचे सातत्यपूर्ण आयोजने व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

आमदार डॉ. तांबे म्हणाले, की कृषी संस्कृतीची खरी सुरुवात महिलेने केली. त्यामुळेच ती टिकली व पुढे चालत आली आहे. त्यामुळे आगामी काळात शेतीविकासासाठी पुरुषांसह महिलांना पुढे आणायची गरज आहे. शेती हा व्यवसाय म्हणून करावा, त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्वीकार करून समृद्ध व्हावे, असे त्यांनी सांगितले. 

कृषी दिंडीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांनतर माती, शेती अवजारांची पूजा करून जागतिक महोत्सवाची सुरुवात झाली. कृषी, देशी गोवंश संवर्धन, सामाजिक कार्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान यावेळी करण्यात आला. या महोत्सवात कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोग, दुर्मीळ वनौषधी प्रदर्शन, देशी गोवंश, बांबू शेतीतील उद्योग व व्यवसाय यावर मांडणी करण्यात आली आहे.  --------------------  कृषी माउली २०२० पुरस्कार विजेते 

  • शेतकरी गट : राजेंद्र भट : नैसर्गिक व जैविक पद्धतीने शेती व मार्गदर्शन 
  • पशू गोवंश व दुग्ध व्यवसाय गट : डॉ. गोपालभाई सुतारिया, बंसी गीर गोशाला, गुजरात 
  • सामाजिक कार्य गट : कल्लाप्पा गेरडे, कुरंदवाड, ता. शिरोळ, जि. सांगली 
  • शासकीय कृषी विभाग : अनिल भोकरे, कृषी उपसंचालक, कृषी अधीक्षक कार्यालय, जळगाव 
  • आध्यात्मिक व सामाजिक कार्यसंस्था गट : मंगल ग्रह सेवा संस्था, अमळनेर   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com