कापसाला एक हजार रुपये बोनस जाहीर करा ः जावंधिया 

कापसाला एक हजार रुपये बोनस जाहीर करा ः जावंधिया 
कापसाला एक हजार रुपये बोनस जाहीर करा ः जावंधिया 

पुणे ः भारतीय कापूस महामंडळाकडे (सीआयआय) कापसाच्या जुन्या ८ लाख गाठींचा साठा असून, जागतिक बाजारपेठेत सुताचे दरदेखील कमी होत आहेत. तर आगामी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या कापूस हंगामात बोनससह ५ हजार ५५० रुपयांनीदेखील कापूस खरेदी होणे शक्य नाही. या पार्श्‍वभूमीवर प्रतिक्विंटल १ हजार रुपये बोनस जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते व बाजार अभ्यासक विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. 

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ५०० रुपये बोनसच्या घोषणेचीदेखील आठवण पत्रात करून देण्यात आली आहे. मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की अमेरिका चीन व्यापारयुद्धाचा फायदा भारतीय शेतकऱ्यांना होईल, कापूस व सोयाबीनची चीनला निर्यात वाढेल, हा प्रचार खोटा ठरला असून, अमेरिका आणि जागतिक बाजार पेठेत मंदी असल्याचे सध्याचे वास्तव आहे. तर भारतातून कापसाची निर्यात वाढली नसून, आयात वाढली आहे. 

या वर्षी भारताच्या इतिहासात सर्वाधिक ३० लाख गाठींची आयात झाली आहे. तर सुताच्या निर्यातीतदेखील घट झाली आहे. सरकारने २०१९-२० साठी कापसाला १०० रुपये बोनस जाहीर केला आहे. मात्र भारतातील आयात झालेला कापूस, शिल्लक कापूस आणि ऑक्टोबरमध्ये नव्याने येणाऱ्या उत्पादनामुळे प्रोत्साहन मूल्यासह ५ हजार ५५० रुपयांनीदेखील कापूस खरेदी होणे शक्य नाही. या पार्श्‍वभूमीवर प्रतिक्विंटल १ हजार रुपये बोनस जाहीर करावा, अशी मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com