ओला दुष्काळ जाहीर करा; बच्चू कडूंचे मुंबईत आंदोलन 

ओला दुष्काळ जाहीर करा ः बच्चू कडू 
ओला दुष्काळ जाहीर करा ः बच्चू कडू 

मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी, तसेच पीकविम्याची रक्कम ताबडतोब मिळावी, या मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी (ता. १४) मुंबईत मोर्चा काढला. मुंबईत राजभवनाच्या दिशेने जाणारा हा मोर्चा पोलिसांनी अडविला. शिवाय पोलिसांनी बच्चू कडू यांनाही ताब्यात घेतले. बच्चू कडू यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत पोलिसांची गाडी अडवली. 

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी, तसेच पीकविम्याची रक्कम ताबडतोब मिळावी, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. ‘आपला भिडू बच्चू कडू’ अशा घोषणा देत आंदोलक शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करीत होते. 

परतीच्या पावसाने राज्यभरात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे राज्याच्या सत्तासंघर्षाचा तिढा सुरू आहे. हा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी पुढाकार घेतला आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, यासाठी त्यांनी हा मोर्चा काढला. राजभवनावर मोर्चा काढण्यात येत असल्याने परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रहार संघटना अध्यक्ष आमदार कडू आक्रमक झाले. ओला दुष्काळ जाहीर करा, यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित केला होता. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा अडवल्याने कडू यांनी संताप व्यक्त केला. ‘‘आंदोलनाला परवानगी देत नाही; पण हुक्का बार चालू ठेवता,’’ अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना सुनावले. पोलिसांनी लाठीचार्ज करीत दडपशाही करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com