उसासाठी यंदाची ‘एफआरपी’ जाहीर करा

यंदाच्या गळीत हंगामातील उसाची एफआरपी तत्काळ जाहीर करावी, या मागणीसाठी रघुनाथदादा प्रणीत शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.
उसासाठी यंदाची ‘एफआरपी’ जाहीर करा Announce this year's FRP for sugarcane
उसासाठी यंदाची ‘एफआरपी’ जाहीर करा Announce this year's FRP for sugarcane

कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामातील उसाची एफआरपी तत्काळ जाहीर करावी, या मागणीसाठी रघुनाथदादा प्रणीत शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, ‘‘यंदाच्या हंगामातील उसाची एफआरपी जाहीर नाही. कोरोनामुळे कृषी क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. अशातच नऊ महिने उलटले तरी केंद्र सरकारने एफआरपी जाहीर न करता ती राज्य सरकारने करावी, अशी भूमिका घेतली आहे. राज्य सरकारनेही ती जाहीर केलेली नाही. वास्तविक १ ऑक्‍टोबर २०२०गाळप हंगाम २०२१-२२ची एफआरपी जाहीर होणे गरजेची होते. वेळेत एफआरपी जाहीर न झाल्याने ऊस उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.  कोरोनाच्या काळात रासायनिक खते, कीटकनाशक, तणनाशक, इंधन, वीज बिलात वाढ केली आहे. त्यामुळे उसाच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. परिणामी एफआरपीत वाढ करणे गरजेचे आहे.  दरम्यान, सरकारने आता एफआरपीची रक्कम जाहीर केले पाहिजे. आता कॉँग्रेस, राष्ट्रवादीप्रमाणे भाजप व शिवसेनच्या ताब्यातही साखर कारखाने आले आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधी पक्षाचेही हितसंबंध साखर कारखानदारीत गुंतले आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर कोणताही राजकीय पक्ष बोलत नाहीत. इतरवेळी एकमेकांचे वाभाडे काढणारे सत्ताधारी व विरोधक एफआरपीबद्दल काहीही बोलत नाहीत.  निविष्ठात मोठी वाढ झाल्याने मागील एफआरपीपेक्षा वाढ केली पाहिजे, तरच ऊस उत्पादक शेतकरी टिकणार आहेत. त्यातच केंद्र व नागरी मंत्रालयाने २२ ऑक्‍टोबर २०२०मध्ये अधिसूचना काढून एफआरपीचा निर्णय राज्य शासनाने घ्यावा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार या बद्दल तत्काळ निर्णय घ्यावा, नाहीतर यावर तीव्र आंदोलन केले जाईल.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com