मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या पुरस्कारांची घोषणा

Announcement of Maratha Chamber of Commerce Awards
Announcement of Maratha Chamber of Commerce Awards

पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्‍ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा रमाबाई जोशी महिला उद्योजक पुरस्कार घरगुती तांदळाच्या मिलच्या उत्पादक क्लायंबर सिस्टीमच्या उज्ज्वला गोसावी यांना जाहीर झाला आहे. चेंबरचे अध्यक्ष प्रदीप भार्गव आणि महासंचालक प्रशांत गिरबने यांनी मंगळवारी (ता. ३) पत्रकार परिषदेमध्ये विविध पुरस्कारांची घोषणा केली. 

गुरुवारी (ता. ५) सायंकाळी ६ वाजता बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कार वितरण कार्यक्रम फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया यांच्या हस्ते होणार आहे.

विविध पुरस्कार पुढीलप्रमाणे ः डॉ. आर. जे. राठी हरित पुढाकार पुरस्कार ः सुनील नाईक, प्रमोज वैद्य (जाबील सर्किट इंडिया प्रा. लि.), बी. जी. देशमुख उद्योगांचे सामाजित दायित्व पुरस्कार ः कृष्णन कोमंदूर (आदर पूनावाला क्लीन सिटी), सपना राठी (विंडसर शेल्टर्स), रितू छाब्रिया (मुकुल माधव फाउंडेशन), रमाबाई जोशी महिला उद्योजक पुरस्कार ः उज्ज्वला गोसावी (क्लायंबर सिस्टीम), प्रीती रासकर (रायका इंजिनिअरिंग सोल्युशन्स), किरण नातू उद्योजकता पुरस्कार ः आशुतोष गोखले (ऑलिमॅक्स सिस्टीम), यतीन तांबे (फ्रिक्शन वेल्डिंग), जी. एस. पारखे पुरस्कार ः प्रशांत पानसरे (इन्टेलिमेनंटर टेक्नॉलॉजिस), विजय देशपांडे (सॅम इंटरग्रेशन), सुबोध जोशी (सुव्हिरॉन इक्विपमेंटस) 

तांदळाच्या घरगुती मिलविषयी  शेतकऱ्यांना घरातच साळीपासून तांदूळ तयार करता यावा यासाठी घरगुती मिल तयार करण्यात आली आहे. या मिलद्वारे हातसडीच्या तांदळांच्या दर्जाचा तांदूळ तयार होत असल्याचे गोसावी यांनी सांगितले. एका तासामध्ये २० किलो साळ भरडण्याची क्षमता मशिनची असून, ही मशिन सौरऊर्जेवर देखील चालू शकणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com