जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

पुणे : ऑक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच ६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागासांठी २६ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. यात सदस्य पदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे.

या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली असून, ५ ते ११ सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. त्यांची छाननी १२ सप्टेंबर रोजी होईल. १५ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल. मतदान २६ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. तर निवडणुकीची मतमोजणी २७ सप्टेंबर रोजी तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे.

जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची नावे : म्हाळुंगे तर्फे घोडा, नांदूर, मांदळेवाडी, कुरवंडी, पोंदेवाडी, लाखणगाव (ता. आंबेगाव), कोळोली (ता. बारामती), हिर्डोशी, शिरगाव (ता. भोर), देलवडी, नाथाची वाडी, देऊळगाव राजे, वासुंदे, रोटी (ता. दौंड), शेळगाव, उद्धट, कालठण नं. १, खोरोची, कांदलगाव, अगोती नं. १, वडापुरी, तरटगाव, बोराटेवाडी, कालठण नं. २, ओगती नं. २, पवारवाडी, गोखळी, पंधारवाडी (ता. इंदापूर), गोरेगाव, भामळे, संतोषनगर, वाकी बुद्रुक, जऊळके खुर्द, कोहिंडे बुद्रुक, सोळू, वडगाव घेनंद, धामणे (ता. खेड), डोंगरगाव, तुंग, ठाकुरसाई, केवरे (ता. मावळ), जवळ, खरावडे, पिंपळेली (ता. मुळशी), खेंगरेवाडी-शिंदेवाडी, पांगारे, नवलेवाडी, चिव्हेवाडी, घेरापुरंदर-मिसाळवाडी (ता. पुरंदर), राजंणगाव गणपती, आंबळे, चव्हाणवाडी, कळवंतवाडी, धानोरे, कर्डे, ढोकसांगवी (ता. शिरूर), भाटी वागदरा, आसनी दामगुडा, आसनी मंजाई (ता. वेल्हे).

रिक्त सरपंचपदासाठी पोटनिवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची नावे : सानवडी, करंजे, अशिंपी (ता. भोर), धुवेली (ता. खेड), आंबेगाव खुर्द, गिवशी (ता. वेल्हे).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com