agriculture news in marathi, annual credit plans decleared, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात कृषी कर्जासाठी ७३९४ कोटींची तरतूद
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 एप्रिल 2018
पुणे : पुणे जिल्हा बँकेचा चालू वर्षाचा एकूण ५६ हजार १५४ कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा जाहीर करण्यात करण्यात आला. यात कृषी कर्जासाठी ७३९४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यांचे प्रमाण प्राथमिकता कर्जापैकी २१ टक्के एवढे आहे. हा पतआराखडा जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा अग्रणी बँकेसह सर्व बँकांच्या पुढाकाराने तयार करण्यात आला आहे.
 
पुणे : पुणे जिल्हा बँकेचा चालू वर्षाचा एकूण ५६ हजार १५४ कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा जाहीर करण्यात करण्यात आला. यात कृषी कर्जासाठी ७३९४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यांचे प्रमाण प्राथमिकता कर्जापैकी २१ टक्के एवढे आहे. हा पतआराखडा जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा अग्रणी बँकेसह सर्व बँकांच्या पुढाकाराने तयार करण्यात आला आहे.
 
जिल्‍ह्याच्या पतपुरवठा आराखड्याच्या अहवालाचे प्रकाशन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिनेश डोके यांच्या हस्ते सोमवारी (ता.२) करण्यात आले.  या वेळी बँक आॅफ महाराष्ट्र परिमंडल पूर्व क्षेत्रीय व्यवस्थापक संजय मणियार, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी रोशन महाजन, जिल्हा उद्योग केंद्राचे सरव्यवस्थापक काशीनाथ डेकाटे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आनंद बेडेकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे उपसरव्यवस्थापक श्री. इंगळे, सहायक सरव्यवस्थापक श्री. जाधव आदी उपस्थित होते.
 
या वेळी दिनेश डोके म्हणाले, की पतपुरवठा आराखडा ५६ हजार १५४ कोटी रुपयांचा असून, मागील वर्षापेक्षा तो पंधरा टक्क्यांनी अधिक आहे. प्राथमिक क्षेत्रासाठी ३१ हजार १०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही एकूण पतपुरवठ्याच्या ६२ टक्के अधिक आहे.
 
कृषी कर्जासाठी ७३९४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यांचे प्रमाण प्राथमिकता कर्जापैकी २१ टक्के एवढे आहे. कृषी कर्जामध्ये प्रामुख्याने सेंिद्रय शेती, फुले व फळबाग लागवड, हरितगृह, कृषी निर्यात योजना, कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, तसेच शेतीपुरक व दुय्यम योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
 
पतपुरवठा आराखड्यामध्ये व्यापारी बँका, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेसह ४१ बँकेच्या एक हजार ६१५ शाखांचा समावेश  आहे. जिल्ह्यातील सर्व बँकांनी ३१ जानेवारी २०१७ अखेर पीक कर्जासाठी २४४१ कोटी रुपयांचे वाटप करून ६५ टक्के उद्दीष्टपूर्ती केली आहे. 
 
पतपुरवठा आराखड्यात लघुउद्योजकांसाठी १३ हजार १०६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. स्वयंरोजगार योजनांसाठी, शैक्षणिक कर्जासाठी, गृहकर्जासाठी, छोट्या व्यवसायासाठी १४ हजार ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

इतर ताज्या घडामोडी
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...