सांगली बाजारसमिती देणार हळद, बेदाणा तारणावर कर्ज ः पाटील

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली ः सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडून हळद, बेदाणा तारणावर सहा टक्के व्याजदराने कर्ज देण्यात येणार असल्याचे सभापती दिनकर पाटील यांनी जाहीर केले.

येथील मार्केट यार्डातील वसंतदादा पाटील सभागृहात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण सभा सभापती दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. २९) झाली. या वेळी जिल्हा बॅंकेचे संचालक विक्रम सावंत, काँग्रेसचे नेते विशाल पाटील, प्रा. सिकंदर जमादार, उपसभापती तानाजी पाटील, खंडेराव जगताप, चेंबरचे अध्यक्ष शरद शहा, हमाल पंचायतीचे विकास मगदूम उपस्थित होते.

या वेळी विशाल पाटील म्हणाले, की संचालक मंडळाने बाजार समिती सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बाजार समितीचे मिरजेसह जत आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यांत कार्यक्षेत्र असून, ते एकत्र राहण्यासाठी प्रयत्न करावा. मात्र, विभाजन करण्याचा प्रयत्न केल्यास त्रासाचे ठरेल. दुष्काळी जत आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यांचे उत्पन्न कमी असले तरी त्यांना बरोबर घेण्याची गरज आहे. तोट्यातील दुय्यम आवाराकडे दुर्लक्ष करू नका. पश्‍चिम भाग सधन असला तर तालुक्‍याचा अनुशेष भरून काढताना पूर्व भागाच्या विकासाला महत्त्व द्या.

हळद आणि बेदाण्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून तारण कर्ज योजना सुरू केली जाणार आहे. सहा टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध केले जाईल. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती पाटील यांनी केले.

२०१७-१८ या आर्थिक वर्षातील ताळेबंद बाजार समितीने निश्‍चित केला असून, १८ कोटी १५ लाख ८३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. १३ कोटी २३ लाख ४ हजार रुपये खर्च झाला असून ४ कोटी ९२ लाख ५३ हजार १९ रुपयांचा वाढावा असल्याचे सचिव एन. एम. हुल्याळकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com