कृषी क्षेत्राचे उद्योगात रूपांतर करण्यासाठी सरकारशी समन्वय : शहा

एमसीसीआयएची वार्षिक सभा
एमसीसीआयएची वार्षिक सभा

पुणे   ः भविष्यात उद्याेगांना सुवर्णकाळ असेल, २०२५ मध्ये भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सुदृढ अर्थव्यवस्था असलेला देश असणार आहे. विविध उद्याेगांच्या सक्षमीकरणाबराेबच कृषी क्षेत्राचे उद्याेग क्षेत्रामध्ये रूपांतर करण्यासाठी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (फिक्की) सरकारशी समन्वय साधत आहे, अशी माहिती फिक्कीचे अध्यक्ष राशेष शहा यांनी दिली.

मराठा चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲँड ॲग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) मंगळवारी (ता. २५) झालेल्या ८४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर अध्यक्षपदाची सूत्रे मावळते अध्यक्ष प्रमाेद चाैधरी यांनी नवनियुक्त अध्यक्ष प्रदीप भार्गव यांच्याकडे सुपूर्त केली. या वेळी आयोजित कार्यक्रमात शहा बाेलत हाेते. 

या वेळी शहा म्हणाले, की भारतीय उद्याेगांसाठी पुढील १० वर्षे हा सुवर्णकाळ असणार आहे. या काळात अनेक संधी उद्याेगांना उपलब्ध असतील. भारताची अर्थव्यवस्था लंडन आणि जर्मनीच्या अर्थव्यवस्थेचा टप्पा आेलांडून जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार आहे. या प्रवासात नव्या भारताची निर्मिती हाेणार असून, उद्याेगांच्या जबाबदाऱ्यादेखील वाढणार आहेत. यासाठी उद्याेगांनी अधिक पारदर्शी हाेण्याची गरज आहे. देशातील ५० टक्के नागरिक शेती क्षेत्रावर अवलंबून असून, शेती क्षेत्राचे उद्याेग क्षेत्रामध्ये रूपांतर करण्यासाठी फिक्की सरकारशी समन्वय साधत आहे.  

प्रदीप भार्गव म्हणाले, की केवळ मी कर देताे म्हणून माझे कर्तव्य संपले या विचारातून उद्याेगांनी बाहेर पडले पाहिजे. सामाजिक आणि पर्यावरणीय ऋण आपल्यावर आहे. या भावनेतून उद्याेगांनी सामाजिक दायित्वासाठी पुढे येण्याची गरज आहे. उद्याेजकता विकास आणि उद्याेगांच्या समस्या साेडविण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. या वेळी शहा यांच्या हस्ते हडपसर येथील चेंबरच्या नवीन सेंटरचे उद्‌घाटन करण्यात आले. चेंबरचे महासंचालक अनंत सरदेशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com