सांगली जिल्ह्यात दुष्काळ निवारणार्थ आणखी ४७ कोटी

दुष्काळ निवारणार्थ आणखी ४७ कोटी
दुष्काळ निवारणार्थ आणखी ४७ कोटी

सांगली : राज्य शासनाने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ४७ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता आला आहे. यापूर्वी आलेल्या ६८ कोटींसह ११६ कोटी रुपयांचे ८५ टक्के वाटप पूर्ण झाले आहे. जिल्हा बॅंकेसह सर्व बॅंकांतील खातेदारांना गुरुवारपासून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. 

राज्य शासनाने दुष्काळी निधी जाहीर केली. पहिल्या टप्प्यात ६८ कोटी रुपये निधी मिळाला होता. त्याचे वाटप सुरू असतानाच ४७ कोटी रुपयांचा दुसरा हप्ताही आला आहे. त्यांचे वितरण सध्या युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजे ८५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. प्रत्यक्षात २० टक्के लोकांच्या खात्यावरही निधी जमा झाला नसल्याच्या तक्रारी आहेत. 

जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले ...

  •  जिल्ह्याचा जून अखेरचा टंचाई आराखडा-१९.१५ कोटी 
  • मे महिन्यात ४९६ गावे, २६०५ वाड्या-वस्त्यांवर टंचाई शक्‍य 
  • सध्या २५७ गावे-वाड्यावस्त्यांना ९३ टॅंकरने पिण्याचा पाणीपुरवठा 
  • म्हैसाळ योजना पंप दुरुस्तीसाठी २० दिवस राहणार बंद 
  • उन्हाळ्यात सिंचन योजना पूर्ण क्षमतेने राहणार सुरू
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com