Agriculture news in Marathi Another corona patient in Sindhudurg | Agrowon

सिंधुदुर्गात आणखी एकजण कोरोनाबाधित 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 मे 2020

सिंधुदुर्ग ः मुंबईवरून जांभवडे (ता. कुडाळ) येथे आलेल्या आणखी एका २७ वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सिंधुदुर्गातील कोरोना रूग्णांची संख्या चारवर पोहोचली आहे. आत्तापर्यंत सापडलेले सर्व रूग्ण मुंबईशी संबंधित आहेत. दरम्यान नव्याने सापडलेल्या रूग्णांसोबत आणखी तिघेजण मुंबईवरून आले असून त्यांचे स्वॅब तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. 

सिंधुदुर्ग ः मुंबईवरून जांभवडे (ता. कुडाळ) येथे आलेल्या आणखी एका २७ वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सिंधुदुर्गातील कोरोना रूग्णांची संख्या चारवर पोहोचली आहे. आत्तापर्यंत सापडलेले सर्व रूग्ण मुंबईशी संबंधित आहेत. दरम्यान नव्याने सापडलेल्या रूग्णांसोबत आणखी तिघेजण मुंबईवरून आले असून त्यांचे स्वॅब तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. 

कोरोनापासtन काही अंशी सुरक्षित मानला गेलेल्या सिंधुदुर्गात आता कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. २३ मार्चला पहिला रूग्ण सापडला होता. त्यानंतर जवळपास महिनाभर एकही रूग्ण जिल्ह्यात सापडला नव्हता. मुंबईवरून येणाऱ्यांची संख्या वाढू लागली त्यामुळे रूग्णांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. २८ एप्रिलला मुंबईच्या परळ भागातून चौघेजण जांभवडे (ता. कुडाळ) येथे जात होते. या चौघांना खारेपाटण येथेच प्रशासनाकडून ताब्यात घेत कुडाळ येथे संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले. 

बाधीत क्षेत्रातून आल्यामुळे ५ मेस त्यातील एकाचा स्वॅब तपासणीकरिता पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल गुरूवारी (ता. ७) सायकांळी उशिरा जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या हा रूग्ण गावात गेलेला नाही. त्यामुळे त्याचा अन्य कुणाशीही संपर्क आलेला नाही. परंतु त्याच्यासोबत आणखी तिघेजण मुंबईवरून आले आहेत. त्यामुळे त्यांचा अहवाल तपासणीकरिता पाठविण्यात आला आहे. 

दरम्यान जिल्ह्यातील रूग्णांची संख्या आता चारवर पोहोचली आहे. आत्तापर्यंत सापडलेले सर्व रूग्ण हे मुंबईशी संबंधित आहेत.तीन चार दिवसांपूर्वी वेंगुर्ला येथील आंबा वाहतूक करणाऱ्या चालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...