Agriculture news in marathi Another dam will be in the stomach of the Koyna Dam | Agrowon

कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरण

टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 जानेवारी 2020

कोयना जलविद्युत प्रकल्पाचे चार टप्पे पूर्ण झालेत. त्यातून दोन हजार मेगावॉट वीजनिर्मिती होते. प्रकल्पाचा पाचवा व सहावा टप्पा मंजूर आहे. प्रकल्पाचे नऊ टप्पे प्रस्तावित आहेत. त्या माध्यमातून दोन हजार मेगावॉट वीजनिर्मिती करण्याचे नियोजन आहे. 
- दीपक मोडक, अध्यक्ष, कोयना धरण सुधारणा व पुनर्वसन समिती

कोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५ टीएमसी आहे. त्या धरणातील पाण्याचे विभाजन करण्यासाठी धरणांतर्गत सहा टीएमसी क्षमतेचे छोटे धरण बांधण्यात येणार आहे. त्यासाठी जलसंपदा विभाग जागा बघत आहे, अशी माहिती कोयना धरण सुधारणा व पुनर्वसन समितीचे अध्यक्ष दीपक मोडक व कोयना प्रकल्पाचे मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते यांनी दिली.

कोयना धरणाच्या जुन्या उपकरणात सुधारणा करून धरणाचे नव्याने पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी जागतिक बॅंक अर्थसाहाय्य करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

शासनाने राज्यातील नऊ प्रमुख धरणांची पाहणी करून सुरक्षा सुधारणा व त्याचे पुनर्वसन करण्यासाठी स्वतंत्र समिती नियुक्त केली आहे. त्या समितीचे अध्यक्ष कोयना प्रकल्पाचे निवृत्त मुख्य अभियंता दीपक मोडक आहेत. या समितीने कोयना धरणाची नुकतीच पाहाणी केली. येथे भेट देण्यापूर्वी समितीने डिंबे, उजनी, सीना-कोलेगाव, राधानगरी, महिंद, कण्हेर, धोम, भाटघर धरणांचीही पाहणी केली. ही समिती शासनाला धरणातील सुधारणांच्या शिफारशी करणार आहे. सध्या ही समिती कोयना धरणाची पाहणी करत आहे. 

कोयना प्रकल्पाचे मुख्य अभियंता श्री. मोहिते, सदस्य चंद्रकांत माळी, आर. एस. गायकवाड, एन. डी. आटकेकर, सी. ठाणुवेलू उपस्थित होते. 

मोडक म्हणाले, ‘‘कोयना धरणाला साडेसहा दशके झाली आहेत. सहा वक्र दरवाजांतून दर वर्षी नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे धरणाचा अप्रोन स्टील बेसीन धरणाच्या तळभागाचे कॉंक्रीट उखडले आहे. त्याचबरोबर कोयना धरणातून पाण्याची गळती होत आहे. ती मोजण्याचे उपकरण जुने झाले आहे. त्यामुळे गळतीची अचूक माहिती मिळत नाही. ती उपकरणे नवीन बसवण्यात येतील. समितीने शिफारशी केलेले काम करण्यासाठी जागतिक बॅंक अर्थसाहाय्य करेल. दोन दिवसांपासून कोयना धरणाची पाहणी समितीकडून झाली आहे.

कोयना धरणात कमी पाणी असल्यावर धरणाची भिंत मागे, तर पाणी जादा असल्यावर भिंत पुढे झुकते, असे एका निष्कर्षातून समोर येत आहे. कोयना धरण हे मर्यादित झुकायला पाहिजे, असे समितीचे मत असून, त्यासाठी कोयना धरणात टिल्ट मीटर व अपलिफ्ट प्रेशर सेल उपकरण बसविण्याची शिफारस केली आहे. त्यानंतर त्यात सुधारणा होईल.’’

 


इतर अॅग्रो विशेष
कहर ‘कोरोना’चाकोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाने जगभर दहशतीचे...
नदी संवर्धनाचा केरळचा आदर्शकेरळ हे भारताच्या दक्षिण टोकाचे एक राज्य. अरबी...
शेतमजुराच्या मुलीने पटकावला ‘शिवछत्रपती...अकोला ः प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एका खेड्यातील...
साडेआठ हजार कोटी खर्चूनही 'जलयुक्त' फेल...मुंबई : फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी जलयुक्त...
पीक विमा योजना यापुढे ऐच्छिक; केंद्र...नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
सेंद्रिय धान्य महोत्सवातून हक्काची...तीन-चार वर्षांपासून कृषी विभागातर्फे पुणे येथे...
प्रयोगशीलतेने घडविली समृद्धी..अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील पाटेगाव (जि. नगर)...
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शिवरायांची भविष्यवेधी ध्येयधोरणेछत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने रयतेचा राजा...
आपणच आपला करावा उद्धारशेती फायद्याची करायची असेल, तर शेतकऱ्यांनी एकत्र...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
कापसाचे ६४७ कोटींचे चुकारे थकीतअमरावती ः बाजारात दर कोसळल्याने महाराष्ट्र राज्य...
‘पणन’ची कापूस खरेदी उच्चांकी दिशेनेऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन...
शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत ८५ स्वराज्यरथ...पुणे : ‘‘पुण्यात शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आज...
सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकाची...औरंगाबाद शहरापासून सुमारे बारा किलोमीटरवर...
कापूस उद्योगाचे चीनमध्ये पाच हजार कोटी...जळगाव ः देशातील सूत व कापूस गाठींचा मोठा खरेदीदार...
हमीदराने खरेदीसाठी तुरीचे संपूर्ण...वाशीम ः तुरीचे स्वतंत्रपणे पीक घेण्याची पद्धत...
पंधरा लाख कापूस गाठींची खानदेशातील...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...