Agriculture news in Marathi Another fisherman from Devgad dies | Agrowon

देवगडातील आणखी एका मच्छीमारांचा मृत्यू 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 मे 2020

सिंधुदुर्ग ः देवगड बंदरातील आणखी एका मच्छीमाराचा जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.त्यामुळे विशिष्ट आजाराने मृत झालेल्यांची संख्या तीन वर पोहोचली आहे. दरम्यान जिल्हा रूग्णालयात आयसोलेशन कक्षात उपचार घेत असलेल्या आणखी एका रूग्णाचा मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्युशी कोरोनाचा संबंध नसल्याचे स्पष्टीकरण जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. धनजंय चाकुरकर यांनी दिले आहे. 

सिंधुदुर्ग ः देवगड बंदरातील आणखी एका मच्छीमाराचा जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.त्यामुळे विशिष्ट आजाराने मृत झालेल्यांची संख्या तीन वर पोहोचली आहे. दरम्यान जिल्हा रूग्णालयात आयसोलेशन कक्षात उपचार घेत असलेल्या आणखी एका रूग्णाचा मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्युशी कोरोनाचा संबंध नसल्याचे स्पष्टीकरण जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. धनजंय चाकुरकर यांनी दिले आहे. 

देवगड बंदरातील मच्छीमारांना गेल्या काही दिवसांपासून विशिष्ट आजाराने ग्रासले आहे. पाय सुजणे, उलट्या होणे, जुलाब होणे अशा प्रकारची लक्षणे काही मच्छीमारांमध्ये दिसून आली होती. त्यामुळे मच्छीमारांनी ही बाब पालकमंत्री उदय सांमत यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी किनारपट्टी भागाचे सर्व्हेक्षण करण्याची सूचना आरोग्य विभागाला दिली होती. 

आरोग्य विभागाने मच्छीमारांची तपासणी केली होती. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष कोडके यांनी आरोग्य पथक देखील कार्यरत केले होते. दरम्यान सोमवारी (ता. ४) आणखी एका मच्छीमारामध्ये त्या आजाराची लक्षणे दिसून आल्यामुळे त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर तेथे उपचार सुरू होते. परंतु त्याचा बुधवारी (ता. ६) सायकांळी मृत्यू झाला. यापूर्वी अशीच लक्षणे असलेल्या दोघांचा मृत्यू झाला होता. 

त्यामुळे मच्छीमारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.अजूनही त्या आजाराचे निदान झालेले नाही. याशिवाय जिल्हा रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार घेत असलेल्या आणखी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. या दोघांच्या मृत्युशी कोरोनाचा सबंध नाही. त्या रूग्णांच्या किडनी, लिव्हर निकामी झाल्यामुळे झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक श्री. चाकुरकर यांनी स्पष्ट केले आहे. 


इतर बातम्या
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
आहारात फळे, भाज्यांचा वापर वाढवा : डॉ....सोलापूर : "कोरोना महामारीचे संकट सर्वांनाच...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...