अंटार्क्टिकात विक्रमी १८.३ सेल्सिअस तापमानाची नोंद

मागील वाढीचा विक्रम पाच वर्षांतच मोडला गेला. ही वाढ जवळपास एक अंश सेल्सिअसची आहे. याचा अर्थ असा की येथील तापमान पृथ्वीच्या तापमान वाढीपेक्षा वेगाने वाढत आहे. हा नवीन विक्रमी कुणाला माहीत किती दिवस टिकेल. परंतु त्यासाठी जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही. येथील तापमान वाढीमुळे हवामानात बरेच बदल अनुभवायला मिळतील. — प्रो. जेम्स रेन्वीक, हवामान शास्त्रज्ञ, व्हिक्टोरिया विद्यापीठ, वेलिंगटन
actarctica
actarctica

अर्जेंटिना ः अंटार्क्टिका द्वीपकल्पाचे वाढते तापमान सर्व जगासाठी चिंतेचे कारण बनत आहे. शनिवारी (ता. ७) अंटार्क्टिकाचे आतापर्यंतचे विक्रमी तापमान अर्जेंटिना संशोधन केंद्रावर १८.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. यापूर्वी मार्च २०१५ मध्ये १७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.  अंटार्क्टिका द्वीपकल्पाचे तापमान वाढत असल्याने त्याचा परिणाम जागतिक तापमानावर होत आहे. द्वीपकल्पाच्या उत्तर भागात १८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अर्जेंटिना हवामान एजन्सीने ट्विट करत ‘‘येथील तापमानाची आकडेवारी १९६१ कडे जात आहे’’ असे म्हटले. अंटार्क्टिकाचे सर्वांत कमी तापमान १९८३ मध्ये नोंदले गेले. तसेच ही नोंद पृथ्वीवरील आतापर्यंतची सर्वांत कमी तापमानाची होती. रशियान व्होस्टोक केंद्रावर २१ जुलै १९८३ रोजी उणे ८९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. या काळात तापमान सर्वाधिक नीचांकी पातळीवर होते.  ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीचे हवामान शास्त्रज्ञ प्रो. नेरीली अब्राम म्हणाल्या, ‘‘थोड्या तापमानवाढीचाही परिणाम मोठे होतात. किंचित तापमान वाढल्यास बर्फ वितळण्यास अधिक ऊर्जा तयार होते. या खंडात बर्फ ढासळून जास्त परिणाम होतात. बर्फाला घट्ट चिकटवून ठेवणाऱ्या कडा ढासळल्यामुळे जास्त बर्फ वितळतो. अधिक बर्फ वितळल्यास जमिनीवरील पाणी समुद्रात जाऊन समुद्रपातळी वाढण्याची भीती आहे.  सर्वाधिक वेगाने उष्ण होणारा भाग यापूर्वी २४ मार्च २०१५ ला १७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. परंतु ७ फेब्रुवारीला ०.८ अंशाने अधिक म्हणजेच १८.३ सेल्सिअसची नोंद झाली. अंटार्क्टिका द्वीपकल्पाचा दक्षिण आफ्रिकेच्या बाजूचा भाग पृथ्वीवरील सर्वाधिक वेगाने उष्ण होणारा ठरत आहे. येथील तापमान मागील ५० वर्षांत ३ अंश सेल्सिअसने वाढले आहे. सर्वच भागांतील भागातील हिमनद्या वितळत आहेत.  प्रतिक्रिया अंटार्क्टिकाच्या तापमान वाढीचा विक्रम केवळ एका हवामान केंद्रावरील आहे. यासंदर्भात इतर भागात काय घडत आहे आणि पृथ्वीच्या तापमान वाढीच्या काही नोंदी, पुरावे शोधावे लागतील. जागतिक तापमानाची माहिती एकत्रित केल्यास कुठेकुठे किती वाढ झाली याचा अभ्यास करता येईल. — डॉ. स्टेव रिनटाऊल,  समुद्रशास्त्रज्ञ आणि अंटार्क्टिका जाणकार, कॉनवेल्थ सायंटिफिक ॲण्ड रिसर्च ऑर्गनायझेशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com