agriculture news in Marathi, Anup kumar says support to agriculture development, Maharashtra | Agrowon

शेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना देणार ः अनुपकुमार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

आजवरच्या वाटचालीत ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून शेती धोरणांची सर्वांगीण माहिती मिळाली. त्याचादेखील अनेक ठिकाणी उपयोग झाला. त्यामुळे मी सकाळ समूह आणि ‘अग्रोवन’चे आभार मानतो.
- अनुपकुमार, नवनियुक्त कृषी सचिव

नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण आखले आहे. शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून हे उद्दिष्ट गाठणे शक्‍य होणार असून त्याकरिता पहिल्या टप्प्यात विदर्भ, मराठवाड्यात शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्याकरिता प्रयत्न करणार आहे, अशी माहिती नवनियुक्‍त कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध विकास खात्याचे सचिव अनुपकुमार यांनी दिली. 

१९९० च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी असलेल्या अनुपकुमार यांच्या सेवेला २८ वर्ष झाली असून यातील १२ वर्षाचा सेवाकाळ विदर्भात गेला आहे. त्यामध्ये १९९३-९४ मध्ये बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, २००१ मध्ये अकोला जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे संचालक, नागपूर विभागीय आयुक्‍त, विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे प्रभारी, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अशा विविध जबाबदाऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. 

विदर्भ वैधानिक विकास मंडळाचा प्रभारी अध्यक्ष असल्याने विदर्भातील ११ जिल्ह्यांची सर्वंकष माहिती झाली होती. विदर्भ, मराठवाड्यासाठी धोरण ठरविताना अशा प्रकारच्या माहितीचा उपयोग करता येणार आहे. विदर्भात उस्मानाबादी शेळी संगोपनाला चालना देण्याचे प्रस्तावित असून त्यासंदर्भाने मुख्यमंत्री आणि पशुसंवर्धनमंत्री यांच्या मार्गदर्शनात वेळोवेळी पशुपालकांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. विशेष म्हणजे हे काम आव्हानात्मक असल्याने मी ही जबाबदारी स्वतःहून माझ्याकडे घेतली आहे. 

जागतिक पातळीवर दुधाच्या दराचे मोठे संकट निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातदेखील दूध दराबाबत चिंता व्यक्‍त केली जाते. हा प्रश्‍न सोडविण्याला माझे प्राधान्य राहणार आहे. 

सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुख्यमंत्री कार्यालयातील सहसचिव राजेश नार्वेकर यांची ठाणे जिल्हाधिकारीपदी नेमणूक करण्यात आली आहे. तर ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांची मंत्रालयात कामगार विभागाच्या सहसचिवपदी नियुक्ती झाली आहे. ठाणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. आभा शुक्ला यांना सहकार विभागात प्रधान सचिव म्हणून नेमणूक मिळाली आहे. कुटुंब कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची नागपूर विभागीय आयुक्त म्हणून बदली झाली आहे. 

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांची मुंबईत माहिती-तंत्रज्ञान विभागाचे संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त आर. एच. ठाकरे यांची नागपूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून, तर सहायक जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली  आहे.

 


इतर अॅग्रो विशेष
‘गोकूळ’चे दूध आता टेट्रापॅकमध्येही...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (...
खाद्यतेल आयातशुल्क कपातीने सोयाबीन,...पुणे: केंद्र सरकारने खाद्यतेल आयातशुल्कात कपात...
कांदा लिलाव अखेर सुरूनाशिक: जिल्हा उपनिबंधकांनी तातडीने लिलाव सुरू...
केंद्र सरकार खाद्यतेल आयात शुल्क...नवी दिल्ली ः देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाचे...
कांदा खरेदीनंतर अवधीच्या निर्णयात गोंधळ...नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर...
सांगली बाजार समितीत हळदीची उलाढाल २८०...सांगली ः कोरोना विषाणूमुळे बाजार समित्या बंद...
मोसंबी फळपिक विमा अर्जात गारपीटीचा कॉलम...पुणे ः आंबिया बहारातील मोसंबी, डाळिंब,...
पुरानं आमचं जगणंच खरवडून नेलंयसोलापूर ः नदीकाठी शेत असल्यानं दरवर्षी ऊस करतो,...
गुणवत्तापूर्ण सीताफळ उत्पादन हेच ध्येयबाजारपेठेचा अभ्यास आणि योग्य नियोजन केल्यास...
स्पॉन, अळिंबी उत्पादनाचा ‘कोल्हापूर...शिरटी (ता.शिरोळ,जि.कोल्हापूर) येथील उच्चशिक्षित...
धुके पडण्यास प्रारंभ...पुणे ः परतीचा मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
मोह फुलांचा वाढेल गोडवाराज्यामध्ये ऐन नवरात्रीमध्ये मॉन्सून देवतेने...
देखो तो कहीं चुनाव है क्या?‘स रहद पर तनाव है क्या, देखो तो कहीं चुनाव है...
कांदा खरेदीनंतर व्यापाऱ्यांना मिळणार...नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर...
मराठवाड्यात साठ टक्के कपाशीवर गुलाबी...नांदेड : ‘‘मराठवाड्यात लवकर येणारे कापूस वाण...
कंपन्यांनी सर्वेक्षण न केल्यास विमा...पुणे: राज्यात विमा कंपन्यांनी पीक नुकसानीचे...
इथेनॉल दरात तीन रुपयांपर्यंत वाढकोल्हापूर : यंदाच्या हंगामात इथेनॉलनिर्मितीला गती...
एक लाख टन कांदा आयातीची शक्यतानवी दिल्ली ः देशातील कांदा दरवाढीवर नियंत्रण...
कापूस खरेदीसाठी तीस केंद्रे अंतिमनागपूर : गेल्या हंगामात नव्वद केंद्र आणि १५०...
फळ पीकविमा योजनेवर केळी उत्पादकांचा...जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत केळी...