agriculture news in Marathi, Anupam Kasyap says, rain instate after Friday, Maharashtra | Agrowon

राज्यात शुक्रवारनंतर पुन्हा चांगला पाऊसः डॉ. अनुपम कश्यपी

टीम अॅग्रोवन
रविवार, 14 जुलै 2019

पुणे : मॉन्सून हंगामात एका टप्प्यात चांगल्या पावसानंतर काही काळ खंड पडतो. त्यानुसार सध्या राज्याच्या बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र प्रशांत महासागरातील कमकुवत झालेली एलनिनो स्थिती, मॉन्सूनसाठी बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली पोषक स्थिती यामुळे शुक्रवारनंतर (ता. १९) राज्यात चांगल्या पावसाचे संकेत आहेत, अशी माहिती पुणे केंद्राचे हवामान अंदाज प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.  

पुणे : मॉन्सून हंगामात एका टप्प्यात चांगल्या पावसानंतर काही काळ खंड पडतो. त्यानुसार सध्या राज्याच्या बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र प्रशांत महासागरातील कमकुवत झालेली एलनिनो स्थिती, मॉन्सूनसाठी बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली पोषक स्थिती यामुळे शुक्रवारनंतर (ता. १९) राज्यात चांगल्या पावसाचे संकेत आहेत, अशी माहिती पुणे केंद्राचे हवामान अंदाज प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.  

डॉ. कश्यपी म्हणाले, प्रशांत महासागरातील एल निनो स्थिती अतिशय कमजोर असून, तिचा मॉन्सूनवर कोणताही प्रभाव नाही. बंगालचा उपसागर, अरबी समुद्रात कोणतीही नकारात्मक स्थिती नाही. चांगल्या पावसानंतर मॉन्सूनही काहीसा कमजोर झाला आहे. मॉन्सूनने अद्यापही संपूर्ण देश व्यापला नसून, राजस्थानसह वायव्य भारतात मॉन्सून पोचलेला नाही. मॉन्सून हंगामात उत्तर भारतात असलेल्या कमी दाबाचा पट्टा (मॉन्सून ट्रफ) सक्रीय असतो. दक्षिण उत्तरेकडे साकरत असणाऱ्या या पट्ट्यामुळे पावसाचा जोरही कमी अधिक होत असतो.  

सध्या या पट्ट्याचा पंजाब, हरियाणा दरम्यान असलेला भाग हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला आहे. तर पूर्व भाग बंगाल आणि नागलॅंड दरम्यान आहे. त्यामुळे पूर्व भारतातील राज्य आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाने जोर धरला आहे. तर पश्चिम राज्ये आणि वायव्य भारतात पावसाने उघडीप दिली आहे.

मॉन्सून सक्रीय नसल्याने कोकण, घाटमाथा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसात खंड राहील. हवामान विभागाच्या मॉडेलनुसार पुढील जवळपास आठवडाभर पावसाची उघडीप राहणार आहे. १८ जुलै च्या दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार हेण्याचे संकेत आहेत. त्यामुळे १९ ते २५ जुलै दरम्यान देशात मॉन्सून सक्रीय होणार असून, महाराष्ट्रातही चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.


इतर अॅग्रो विशेष
भारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी...कोल्हापूर: भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात...
लॉकाडाउनमध्येही शेतकऱ्यांकडून शेतमालाची...पुणे (प्रतिनिधी)ः कोरोना टाळेबंदी मध्ये शेतमालाची...
खानदेशात साठा वाढल्याने कापूस, सरकी...जळगाव : कापसाची शासकीय खरेदी खानदेशात मागील ६ मे...
राज्यातील २८० बाजार समित्या अडचणीत;...लातूर ः राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा...
उष्णतेच्या लाटेमुळे अकोल्यात केळीचे घड...अकोला  ः जिल्ह्यात या आठवड्यात वाढलेल्या...
विदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...
राजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे  : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...
मॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
एसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...पुणे  ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन...
तंत्रज्ञान आत्मसात करीत प्रयोगशील शेतीत...अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी...
मॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
टोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक...नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा...
उन्हाच्या झळांनी काहीली वाढली पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने...
केळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...
अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात कापूस बियाणे विक्रीला प्रारंभ अकोला ः आगामी हंगामासाठी कापूस बियाणे...
मध्यम धाग्याच्या कापूस खरेदीची ...नागपूर ः एफएक्‍यु ग्रेडमधीलच तिसऱ्या दर्जाच्या...