श्रीरामपूर व्यतिरिक्त जिल्हाभर टॅंकरची धडधड

श्रीरामपूर व्यतिरिक्त जिल्हाभर टॅंकरची धडधड
श्रीरामपूर व्यतिरिक्त जिल्हाभर टॅंकरची धडधड

नगर ः जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र झाली असून, तेरा तालुक्‍यांत ६८६ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. एप्रिल महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे, श्रीरामपूर तालुक्‍यात अजूनही टॅंकरने पाणी देण्याची गरज भासलेली नाही. जिल्हाभरातील साडेदहा लाख नागरिकांना टॅंकरच्या पाण्याचाच आधार उरला आहे. 

गेल्या वर्षी पावसाने दगा दिल्याने यंदा दुष्काळाच्या झळा गंभीर बनल्या आहेत. जनावरांच्या चाऱ्यापेक्षा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र झाला आहे. मोठ्या धरणांच्या लाभक्षेत्रातील काही गावांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील ९० टक्के विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. गावतलाव, पाझरतलाव या वर्षी भरलेच नाहीत. अनेक ठिकाणी टॅंकरच्या पाण्यावर नागरिकांची व जनावरांची तहान भागवली जाते. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या जिल्हाभरातील ४६० गावे व २५४९ वाड्यांतील एक लाख ५५ हजार ५४० लोकांना टॅंकरने पाणी दिले जाते. पाथर्डी, पारनेर, कर्जत, जामखेड तालुक्‍यांमध्ये टॅंकरची संख्या सर्वाधिक आहे.

तालुकानिहाय टॅंकरची संख्या :  संगमनेर ः ४६, अकोले ः ०३, कोपरगाव ः ०६, श्रीरामपूर ः ००, राहुरी ः ०१, नेवासे ः ३१, राहाता ः ०४, नगरः ५६, पारनेर ः १३६, पाथर्डी ः १३९, शेवगावः  ५४, कर्जत ः ८८, जामखेड ः ८०, श्रीगोंदा ः ४२.

मंजूर खेपा (कंसात टक्केवारी) :  संगमनेर ः १२५ (१००), अकोले ः ०८ (१००), कोपरगाव ः १५ (१००), श्रीरामपूरः  ००, राहुरी ः २.५ (२०), नेवासे ः ५७ (१००), राहाता ः १५ (१००), नगर ः १२० (१००), पारनेर ः २६९ (९८), पाथर्डी ः ३०१ (१००), शेवगाव ः १०५ (९९), कर्जत ः १६५ (९१), जामखेड ः ८५ (१००), श्रीगोंदा ः १०२ (१००).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com