agriculture news in marathi, APMC directors on move over delay payment issue | Agrowon

नाशिक जिल्ह्यातील पाच बाजार समिती संचालकांची धावाधाव
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 8 मे 2018

नाशिक : शेतकऱ्यांकडून माल खरेदी करूनही त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यापाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या जिल्ह्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना बरखास्त करून त्या जागी प्रशासक नेमण्याच्या जिल्हा उपनिबंधकांच्या नोटिशीमुळे संचालकांची धावपळ उडाली आहे. या व्यापाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून पैसे अदा करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. 

नाशिक : शेतकऱ्यांकडून माल खरेदी करूनही त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यापाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या जिल्ह्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना बरखास्त करून त्या जागी प्रशासक नेमण्याच्या जिल्हा उपनिबंधकांच्या नोटिशीमुळे संचालकांची धावपळ उडाली आहे. या व्यापाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून पैसे अदा करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. 

 मालेगाव, देवळा, उमराणे, मनमाड व येवला या पाच बाजार समित्यांमध्ये कार्यरत काही व्यापाऱ्यांनी मुदत उलटूनही शेतकऱ्यांचे पैसे अदा न केल्याच्या तक्रारी सहकार विभागाकडे करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात साधारणत: २० व्यापाऱ्यांनी १४१९ शेतकऱ्यांचे ४ कोटी ९५ लाख रुपये थकविले अाहेत.अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश बाजार समित्यांना देऊनही दखल न घेता उलट अभय दिल्याचा मुख्य आक्षेप आहे. या संदर्भात जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी बाजार समित्या व व्यापाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांचे पैसे तत्काळ अदा करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या, मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने अखेर व्यापाऱ्यांना परवाने देताना बाजार समित्यांनी कायदा व नियमांना हरताळ फासल्याचा आक्षेप जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समित्यांना बजावलेल्या नोटिशीत नोंदविला आहे. 

बाजार समितीतील व्यापाऱ्यांना परवाने अदा करताना नियमभंग केल्याप्रकरणी संचालकांना दोषी का ठरविण्यात येऊ नये व बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक का नेमण्यात येऊ नये, अशी विचारणा या नोटिशीत करण्यात आली असून, त्यावर संचालकांना लेखी म्हणणे मांडण्यासाठी येत्या ११ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

असे थकले पैसे
शेतकऱ्यांकडून कांद्याची खरेदी केलेल्या व्यापाऱ्यांनी त्या मोबदल्यात धनादेश दिले होते. परंतु खात्यावर पैसे नसल्याच्या कारणावरून सदरचे धनादेश न वटताच परत आल्याने मनमाड पोलिसांत शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती, तर काही ठिकाणी व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये बाजार समितीच्या संचालकांनी मध्यस्थी करून शेतकऱ्यांना सबुरीचा सल्ला दिला होता. साधारणत: येवला येथील २७ शेतकऱ्यांचे ७ लाख ९४ हजार, मनमाड येथील १७५ शेतकऱ्यांचे २७ लाख ८९ हजार, मालेगाव येथील ८६९ शेतकऱ्यांचे २ कोटी ९६ लाख ७६ हजार, उमराणे येथील १३५ शेतकऱ्यांचे १ कोटी ३८ लाख, नामपूर येथील १२५ शेतकऱ्यांचे ३५ लाख, देवळा येथील ५२ शेतकऱ्यांचे २६ लाख ९१ हजार रुपये थकले आहेत. 

सहकारमंत्र्यांचे आदेश धाब्यावर
जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सहकार विभागाची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीतच मालेगाव, चांदवड, देवळा आदी बाजार समित्यांच्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे पैसे देण्यास विलंब केला जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या वेळी देशमुख यांनी जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांना सदर व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले होते. तथापि, मंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात सहकार विभागाने टाळाटाळ केल्याने व्यापाऱ्यांची भीड चेपली गेल्यानेच हा प्रकार घडल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...