agriculture news in Marathi, APMC employee warning of agitation, Maharashtra | Agrowon

बाजार समिती कर्मचारी संघ पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात
टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 जुलै 2019

नाशिक: महाराष्ट्र राज्यातील बाजार समित्यांमध्ये काम करणारे सचिव ते शिपाई अशा सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून अध्यादेश काढा, नाहीतर पुन्हा मुंबई येथे न्यायहक्कांसाठी आंदोलन पुकारू, असा इशारा महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ यांनी मुख्यमंत्री व पणनमंत्री यांना निवेदनातून दिला आहे. 

नाशिक: महाराष्ट्र राज्यातील बाजार समित्यांमध्ये काम करणारे सचिव ते शिपाई अशा सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून अध्यादेश काढा, नाहीतर पुन्हा मुंबई येथे न्यायहक्कांसाठी आंदोलन पुकारू, असा इशारा महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ यांनी मुख्यमंत्री व पणनमंत्री यांना निवेदनातून दिला आहे. 

आपल्या मागण्यांसाठी बाजार समिती कर्मचारी संघाने अनेकदा पाठपुरावा केला. मात्र शासनाने दखल न घेतल्यामुळे १५ ते २० फेब्रुवारी दरम्यान उपोषण केले. या वेळी सहकारमंत्री सुभाष देहसमुख यांनी २५ फेब्रुवारी रोजी बैठक घेऊन बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही.

येत्या २८ तारखेपर्यंत जर बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्याचा अध्यादेश काढला नाही, शासकीय सेवेत समाविष्ट करून घेतले नाही किंवा पगारासाठी अनुदान दिले नाही तर सरकारने न्याय दिला नाही असे होईल. तर कर्मचारी पुन्हा दुसरे आंदोलन पुकारतील असा इशारा देण्यात आला आहे. 

यावर महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाचे नाशिक विभागीय उपाध्यक्ष नीलेश दिंडे, बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी विलास फुंडकर, कुशी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शिवाजीराव मगर (कृउ बास, पुसद - यवतमाळ), पुरुषोत्तम खडांगळे (पैठण - औरंगाबाद), प्रशांत शिंगणे (देऊळगाव राजा - बुलडाणा), धनराज शिपणे (चिखली - बुलडाणा), सतीश निकम (गंगापूर - औरंगाबाद) यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

इतर अॅग्रो विशेष
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...
कृषी निर्यातीला धोरणात्मक पाठबळ हवे :...जागतिक स्तरावर कृषी निर्यातीत भरपूर संधी आहे,...
शेतकऱ्यांसाठी निवडणुका फक्त...देशात असो किंवा राज्यात ज्या वर्षात निवडणुका...
शेण पावडरपासून कलात्मक वस्तूंची...सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील...
‘मिरॅकल बीन’चा लुप्त होतोय चमत्कारदोन दिवसांपासून ढगाने व्यापलेल्या आकाशाने...
स्वस्त थाळी शेतकऱ्यांना पडू शकते महागातशिवसेनेच्या जाहीरनाम्यातील, त्यांच्या शब्दात ''...
नारळ, सुपारीत फुलली दर्जेदार काळी मिरीरत्नागिरी जिल्ह्यात पावसापासून काही अंतरावरील...
नागपूरच्या बाजारात भाव खाणारी सावळीची...बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सातत्याने विविध...
संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीच्या हालचालीपुणे : बाजार समित्यांच्या जोखडातून शेतीमालाची...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे: अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आणि परिसरावर...
‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे थाटात...सोलापूर : ‘सकाळ ॲग्रोवन’च्या यंदाच्या दिवाळी...
२०१९ पशूगणना : गायींची संख्या १८...पुणे ः देशात २०१२ मध्ये ५१२ दशलक्ष पशुधन होते....
कर्जमाफीच्या गोंधळामुळे सोसायट्या संकटातसांगली ः कर्जमाफीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही....
मुद्रांक शुल्कात आठशे कोटींनी घटसोलापूर : मुद्रांक शुल्कातून २७ हजार कोटींच्या...