बाजार समित्यांनी पेट्रोल, सीएनजी पंप उभारावेत : सतीश सोनी

उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने जिल्हा, राज्य रस्ते किंवा राष्ट्रीय महामार्गावर जागा, तसेच आवश्यक निधी उपलब्ध असलेल्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी पेट्रोल पंप आणि सीएनजी पंपाची उभारणी करावी.
Apmc_pune
Apmc_pune

परभणी ः उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने जिल्हा, राज्य रस्ते किंवा राष्ट्रीय महामार्गावर जागा, तसेच आवश्यक निधी उपलब्ध असलेल्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी पेट्रोल पंप आणि सीएनजी पंपाची उभारणी करावी, असे निर्देश पणन संचालक सतीश सोनी यांनी दिले आहेत. राज्यामध्ये एकूण ३०६ कृषी उत्पन्न बाजार समित्या कार्यरत  आहेत. गेल्या काही वर्षांपासून बाजार समित्यांची उलाढाल सातत्याने कमी होत असल्याचे दिसत आहे. पर्यायी बाजार व्यवस्थेमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांपुढे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. बाजार समित्यांनी परंपरागत पद्धतीने कामकाज चालू ठेवल्यास तसेच उत्पन्नाचे नवनवीन मार्ग न शोधल्यास भविष्यात काही बाजार समित्या अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यायी बाजार व्यवस्था उभी राहिली असली, तरी अनेक वर्षांपासून बाजार समित्यांचे अस्तित्व आणि कामकाज लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी पणन व्यवस्थेमध्ये शेतकरी, तसेच इतर घटकांसाठी सक्षम पर्याय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.  जिल्हा, राज्य रस्ते किंवा राष्ट्रीय महामार्गावर जागा तसेच आवश्यक निधी उपलब्ध असलेल्या बाजार समित्यांनी पेट्रोल पंप, सीएनजी पंप चालू करण्यासाठी विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून कार्यवाही करावी. त्यासाठी सक्षम प्राधिकारी, पणन मंडळाची परवानगी घ्यावी, असे निर्देश पणन संचालक  सतीश सोनी यांनी सोमवारी (ता. २२) निर्गमित केलेल्या परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

 काही ठिकाणी उभारणी बाजार समित्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने बाजार समित्यांनी उत्पन्नाचे विविध मार्ग शोधणे, त्याकरिता वेगवेगळे उपक्रम राबविणे गरजेचे झाले आहे. राज्यातील काही बाजार समित्यांनी त्यांच्या बाजार आवारात पेट्रोल पंप उभारणी केलेली आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध झाली असून, बाजार समितीस नियमित उत्पन्न मिळत आहे. बाजार समित्यांनी काळानुरूप सीएनजी पंपाची उभारणी केल्यास प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com