agriculture news in Marathi APMC should established petrol and CNG pumps Maharashtra | Page 3 ||| Agrowon

बाजार समित्यांनी पेट्रोल, सीएनजी पंप उभारावेत : सतीश सोनी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने जिल्हा, राज्य रस्ते किंवा राष्ट्रीय महामार्गावर जागा, तसेच आवश्यक निधी उपलब्ध असलेल्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी पेट्रोल पंप आणि सीएनजी पंपाची उभारणी करावी.

परभणी ः उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने जिल्हा, राज्य रस्ते किंवा राष्ट्रीय महामार्गावर जागा, तसेच आवश्यक निधी उपलब्ध असलेल्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी पेट्रोल पंप आणि सीएनजी पंपाची उभारणी करावी, असे निर्देश पणन संचालक सतीश सोनी यांनी दिले आहेत.

राज्यामध्ये एकूण ३०६ कृषी उत्पन्न बाजार समित्या कार्यरत  आहेत. गेल्या काही वर्षांपासून बाजार समित्यांची उलाढाल सातत्याने कमी होत असल्याचे दिसत आहे. पर्यायी बाजार व्यवस्थेमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांपुढे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. बाजार समित्यांनी परंपरागत पद्धतीने कामकाज चालू ठेवल्यास तसेच उत्पन्नाचे नवनवीन मार्ग न शोधल्यास भविष्यात काही बाजार समित्या अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यायी बाजार व्यवस्था उभी राहिली असली, तरी अनेक वर्षांपासून बाजार समित्यांचे अस्तित्व आणि कामकाज लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी पणन व्यवस्थेमध्ये शेतकरी, तसेच इतर घटकांसाठी सक्षम पर्याय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. 

जिल्हा, राज्य रस्ते किंवा राष्ट्रीय महामार्गावर जागा तसेच आवश्यक निधी उपलब्ध असलेल्या बाजार समित्यांनी पेट्रोल पंप, सीएनजी पंप चालू करण्यासाठी विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून कार्यवाही करावी. त्यासाठी सक्षम प्राधिकारी, पणन मंडळाची परवानगी घ्यावी, असे निर्देश पणन संचालक 
सतीश सोनी यांनी सोमवारी (ता. २२) निर्गमित केलेल्या परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

 काही ठिकाणी उभारणी
बाजार समित्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने बाजार समित्यांनी उत्पन्नाचे विविध मार्ग शोधणे, त्याकरिता वेगवेगळे उपक्रम राबविणे गरजेचे झाले आहे. राज्यातील काही बाजार समित्यांनी त्यांच्या बाजार आवारात पेट्रोल पंप उभारणी केलेली आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध झाली असून, बाजार समितीस नियमित उत्पन्न मिळत आहे. बाजार समित्यांनी काळानुरूप सीएनजी पंपाची उभारणी केल्यास प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.


इतर ताज्या घडामोडी
सोलापुरी गुळाला ब्रॅंडिंगची संधीसोलापूर ः मधुरतेची वेगळी ओळख असलेला सोलापुरी...
उसाला पर्याय ठरण्याची उन्हाळी नाचणीत...कोल्हापूर : उन्हाळी नाचणी उसाचे कमी उत्पादन...
सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविण्याबाबत...सांगली ः टेंभू, ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन...
सौर प्रकल्पासाठी ८६ ग्रामपंचायतींचे...नागपूर : महा कृषी ऊर्जा धोरणांतर्गत शेतीला...
‘श्रद्धा’चा दूध व्यवसाय युवा पिढीला...नगर ः श्रद्धा नवीन पिढीला दूध व्यवसायात प्रेरणा...
कृषी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाला...नागपूर : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या...
डाळिंबातील कीड- रोग नियंत्रणबहर व्यवस्थापन छाटणी मे महिन्यामध्ये केली असल्यास...
शेतकरी नियोजन पीक : शेवंतीमाझ्याकडे एकूण १० एकर शेती असून, पारंपरिक...
देवराई संवर्धनातून आदिवासींसाठी...मेघालयामध्ये देवराई संरक्षण आणि संवर्धनाला...
नांदेडमध्ये ४२ हजार ६४९ क्विंटल हरभरा...नांदेड : जिल्ह्यात किमान हमी दरानुसार सुरू...
व्हर्च्युअल क्लासरूममुळे कृषी शिक्षणाची...नगर ः व्हर्च्युअल क्लासरूम आणि अॅग्री-दीक्षा वेब...
‘एमआरपी’नुसारच खतांची खरेदी करावी सोलापूर ः यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर...
खरीप हंगामासाठी ११४० कोटी रुपये पीककर्ज...अकोला : अकोला जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी ११४०...
सटाणा बाजार समिती आवाराबाहेर अवैध...नाशिक : सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही...
नाशिक जिल्ह्यात विहिरींनी गाठला तळ नाशिक : जिल्ह्यात गत मॉन्सूनमध्ये अनेक भागांत...
भोकरखेडात चार वर्षांपासून शेतकरी वीज...वाशीम : शेतात वीज जोडणी घेऊन सिंचन करता येईल....
टेंभू योजनेचे पाणी सोडले; ‘बंदिस्त पाइप...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात टेंभू...
प्रत्येक गावाचा होणार कृषी विस्तार...जालना : कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाचे...
तमाशा कलावंतांसाठी सरसावले मदतीचे हात नगर ः : कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे टाळेबंदी...
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत चुरस सोलापूर ः पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा...