agriculture news in Marathi APMCs election postpone Maharashtra | Agrowon

राज्यातील बाजार समित्या निवडणुका पुढे ढकलल्या

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 जानेवारी 2020

पुणे: ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका दृष्टिक्षेपात होत्या त्या बाजार समित्यांच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर मुंबई बाजार समितीची निवडणूक निर्धारित वेळेत होणार असून, पुणे आणि नागपूर बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी सहा महिने वाट पाहावी लागणार आहे. 

पुणे: ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका दृष्टिक्षेपात होत्या त्या बाजार समित्यांच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर मुंबई बाजार समितीची निवडणूक निर्धारित वेळेत होणार असून, पुणे आणि नागपूर बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी सहा महिने वाट पाहावी लागणार आहे. 

राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क देण्याबाबतची कायदेशीर तरतूद मागील भाजप- शिवसेना सरकारने २०१७ मध्ये घेतली होती. या तरतुदी अंतर्गत विविध सुमारे १२ बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या होत्या. यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने महायुतीचा निर्णय बदलून पूर्वी प्रमाणेच विकास सोसायट्या आणि ग्रामपंचायतीतून सदस्य निवड पद्धतीस नुकतीच मान्यता दिली. या बदलासाठीचा राज्यपालांच्या सहीने वटहुकूम काढण्यात येणार आहे. 

या दरम्यान सहा महिन्यांच्या कालावधी होणाऱ्या विविध बाजार समित्यांच्या निवडणुका ६ महिन्यांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याबाबतचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला देण्यात आले आहेत. 

आदेशात म्हटले आहे, की महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा करण्यासाठी सध्या विधान मंडळाचे अधिवेशन सुरू नसल्यामुळे अध्यादेश प्राख्यापित करण्याचा प्रस्ताव राज्यपालांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने बाजार समित्यांच्या निवडणुका सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 

पुणे व नागपूर बाजार समित्यांच्या निवडणुकांबाबत उच्च न्यायालयाचे आदेश असल्यामुळे या बाजार समित्यांच्या निवडणुका अधिनियमातील सुधारित तरतुदीनुसार बाधित होणार असल्यास, ही बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याची सूचना देखील राज्य निवडणूक प्राधिकरणाला करण्यात आली आहे.


इतर अॅग्रो विशेष
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
शेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...
ऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...
जलयुक्त फेल, पुढे काय?उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती...
ऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच...पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन...
कर्जमाफीसाठी आकस्मिकता निधीतून दहा हजार...मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने...
पीकविमा हप्त्यापोटी पाचशे कोटी वितरणास...मुंबई ः पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०१९...
मोसंबी क्लटरमध्ये शाश्‍वत उत्पादन,...औरंगाबाद : मोसंबी उत्पादकांसाठी उत्पन्नाची...
डाळिंब उत्पादनात ३० टक्के घटसांगली ः सुरुवातीला दुष्काळी परिस्थिती, त्यानंतर...
कोरोनाच्या अफवेमुळे पोल्ट्रीचे १५०...पुणे : कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा...
प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...
कहर ‘कोरोना’चाकोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाने जगभर दहशतीचे...