agriculture news in marathi APMC's to remain open : Marketing Director Sunil Pawar issues notification | Agrowon

राज्यात बाजार समित्या सुरूच राहणार : पणन संचालक सुनील पवार

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 मार्च 2020

पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग, फैलाव आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे आणि मुंबई बाजार समित्यांनी दोन दिवस समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बाजार समित्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करता, बाजार समित्या बंद ठेवणे योग्य  होणार नाही. शेतकऱ्यांचा शेतमाल विक्री मध्ये कोणतीही अडचण न येता ग्राहकांना सुरळीत फळे, भाजीपाला, अन्नधान्य मिळावे यासाठी उपाययोजना कराव्यात असे आदेश पणन संचालक सुनील पवार यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग, फैलाव आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे आणि मुंबई बाजार समित्यांनी दोन दिवस समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बाजार समित्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करता, बाजार समित्या बंद ठेवणे योग्य  होणार नाही. शेतकऱ्यांचा शेतमाल विक्री मध्ये कोणतीही अडचण न येता ग्राहकांना सुरळीत फळे, भाजीपाला, अन्नधान्य मिळावे यासाठी उपाययोजना कराव्यात असे आदेश पणन संचालक सुनील पवार यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

फळे भाजीपाला, अन्नधान्य कडधान्ये आदी शेतमाल हा जीवनावश्यक असून, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना या वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि ग्राहकांअभावी शेतमालाचे नुकसान होऊ नये यासाठी बाजार समित्यांमधील व्यवहार सुरळीत असणे गरजेचे आहे. बाजार समित्यांनी बाजार वेळा संपल्यावर आणि शक्यतो रात्रीच्या वेळी युद्धपातळीवर स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाची कामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, दूध, धान्य, भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत सुरळीत ठेवण्याबाबतच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या आहेत. विभागीय आयुक्तालयात अन्न, नागरी पुरवठा विभाग, पणन विभाग, दुग्ध विभागाच्या प्रशासकीय अधिका-यांची बैठक विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

ते म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा व जीवनावश्यक वस्तूंची जादा दराने विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन जनतेचे दैनंदिन जनजीवन सुरळीत सुरू राहण्यासाठी जीवनावश्यक वस्तू सुरळीत व रास्त भावात उपलब्ध होणे गरजेचे आहे. पणन विभागाने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी नियंत्रण ठेवावे. दूध, धान्य, भाजीपाला, तूरडाळ, कांदा, बटाटा, लसूण आदी जीवनावश्यक वस्तू सुरळीतपणे नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात. तर अन्न व प्रशासन विभागाने बाजारात श्वसनासंबंधी आजारांवरील औषधांचा तुटवडा भासणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे,असेही म्हैसेकर यांनी सांगितले.
 


इतर अॅग्रो विशेष
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...
कृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना...यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख...
महिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...