agriculture news in Marathi APMCs will open on holidays Maharashtra | Agrowon

सुटीच्या दिवशीही बाजार समित्या सुरू ठेवा

टीम अॅग्रोवन
रविवार, 8 डिसेंबर 2019

पुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या उत्पादनामुळे बाजारातील आवक मंदावली आहे. यामुळे ग्राहकांना चढ्या भावाने खरेदी करावी लागत असल्याने राज्यातील बाजार समित्या शासकीय आणि साप्ताहिक सुटींच्या दिवशीही सुरू ठेवाव्यात, असे आदेश पणन सहसंचालक विनायक कोकरे यांनी काढले आहेत. या आदेशामुळे पणन संचालनालय शेतकऱ्यांसाठी की ग्राहकांसाठी काम करीत आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

पुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या उत्पादनामुळे बाजारातील आवक मंदावली आहे. यामुळे ग्राहकांना चढ्या भावाने खरेदी करावी लागत असल्याने राज्यातील बाजार समित्या शासकीय आणि साप्ताहिक सुटींच्या दिवशीही सुरू ठेवाव्यात, असे आदेश पणन सहसंचालक विनायक कोकरे यांनी काढले आहेत. या आदेशामुळे पणन संचालनालय शेतकऱ्यांसाठी की ग्राहकांसाठी काम करीत आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

राज्यात अवकाळी पावसाने शेतीच्या आणि पिकांच्या मोठ्या नुकसानीमुळे खरीप आणि रब्‍बी हंगाम लांबल्यामुळे बाजारपेठेत कमी-अधिक प्रमाणात भाजीपाल्याची आवक सुरू आहे. यामुळे विविध भाजीपाल्यांसह पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारपेठेपेक्षा किती तरी जास्त पटींनी किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वाढले आहेत. बाजारातील आवक वाढावी आणि ग्राहकांना चढ्या दराने भाजीपाला खरेदी करावा लागू नये, यासाठी पणन संचालनालयाने शासकीय आणि साप्ताहिक सुट्यांच्या दिवशी बाजार समित्या सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

या आदेशाबाबत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘‘ग्राहकांना चढ्या दराने भाजीपाला खरेदी करावा लागू नये, या उद्देशाने जर पणन संचालनालय काम करत असेल, तर ते चुकीचे आहे. सध्या शेतमालाचे उत्पादनच घटले असून, शेतातच पीक नाही तर शेतकरी काय आकाशातून भाजीपाला आणणार आहे का? बाजार समित्यांना सुटी नकोच अशी आमची नेहमी भूमिका राहिली आहे.

ज्या अडत्यांना सुटी घ्यायची त्यांनी घ्यावी, सुटीच्या दिवशी त्यांचे गाळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी द्यावेत, असे आदेश पणन संचालनालयाने काढावेत. केवळ ग्राहकहित डोळ्यांसमोर न ठेवता शेतकरीहित डोळ्यांसमोर पणन विभागाने ठेवावे. शेतकरीहितासाठी तुम्हाला पगार दिला जातो, हे विसरू नये,’’ असे श्री. पाटील म्हणाले.


इतर अॅग्रो विशेष
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...
राज्यातील बाजार समित्या निवडणुका पुढे...पुणे: ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका...
अण्णासाहेब पाटील महामंडळाने १०००...नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास...
शेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसामांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम...
रेशीम संजीवनीरेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या...
ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव...
‘पोकरा’मध्ये अखेर जबाबदाऱ्यांचे विभाजनअकोला ः पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कृषी...
कृत्रिम रेतन नियंत्रण कायदा कधी? पुणे: पशुधनाच्या आरोग्याला घातक असलेली सध्याची...
किमान तापमानात होतेय घटपुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी...
सात-बारा कोरा करण्याची सुबुद्धी सरकारला...पंढरपूर, जि. सोलापूर: विधानसभा...
सरकारी पीकविमा कंपनी हवी : शेतकरी...नागपूर ः खासगी कंपन्या तयार नसतील तर केंद्राने...
साखर कारखान्यांना लवकरच ‘पॅकेज’मुंबई ः राज्यातील आजारी सहकारी साखर कारखान्यांना...
कमी दरात तूर घेऊन विकली हमीभावाने; दोन...यवतमाळ ः गेल्या हंगामात शेतकऱ्यांकडून कमी दरात...
सेंद्रिय भाजीपाल्याला तयार केले ‘...झुलपेवाडी (जि. कोल्हापूर) येथील चिकोत्रा सेंद्रिय...
शेतकरीहितालाच हवे सर्वोच्च प्राधान्यसहकार क्षेत्रात पूर्वीपासूनच काँग्रेस,...
सोशल मीडिया आणि बॅंकिंग जगात आज कोट्यवधी लोक संवाद करणे आणि माहिती...
बीड जिल्ह्यातील चिंचवडगावमध्ये...बीड: थंड प्रदेशात घेतले जाणारे स्ट्रॉबेरीचे...