agriculture news in Marathi APMCs will open on holidays Maharashtra | Page 3 ||| Agrowon

सुटीच्या दिवशीही बाजार समित्या सुरू ठेवा

टीम अॅग्रोवन
रविवार, 8 डिसेंबर 2019

पुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या उत्पादनामुळे बाजारातील आवक मंदावली आहे. यामुळे ग्राहकांना चढ्या भावाने खरेदी करावी लागत असल्याने राज्यातील बाजार समित्या शासकीय आणि साप्ताहिक सुटींच्या दिवशीही सुरू ठेवाव्यात, असे आदेश पणन सहसंचालक विनायक कोकरे यांनी काढले आहेत. या आदेशामुळे पणन संचालनालय शेतकऱ्यांसाठी की ग्राहकांसाठी काम करीत आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

पुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या उत्पादनामुळे बाजारातील आवक मंदावली आहे. यामुळे ग्राहकांना चढ्या भावाने खरेदी करावी लागत असल्याने राज्यातील बाजार समित्या शासकीय आणि साप्ताहिक सुटींच्या दिवशीही सुरू ठेवाव्यात, असे आदेश पणन सहसंचालक विनायक कोकरे यांनी काढले आहेत. या आदेशामुळे पणन संचालनालय शेतकऱ्यांसाठी की ग्राहकांसाठी काम करीत आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

राज्यात अवकाळी पावसाने शेतीच्या आणि पिकांच्या मोठ्या नुकसानीमुळे खरीप आणि रब्‍बी हंगाम लांबल्यामुळे बाजारपेठेत कमी-अधिक प्रमाणात भाजीपाल्याची आवक सुरू आहे. यामुळे विविध भाजीपाल्यांसह पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारपेठेपेक्षा किती तरी जास्त पटींनी किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वाढले आहेत. बाजारातील आवक वाढावी आणि ग्राहकांना चढ्या दराने भाजीपाला खरेदी करावा लागू नये, यासाठी पणन संचालनालयाने शासकीय आणि साप्ताहिक सुट्यांच्या दिवशी बाजार समित्या सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

या आदेशाबाबत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘‘ग्राहकांना चढ्या दराने भाजीपाला खरेदी करावा लागू नये, या उद्देशाने जर पणन संचालनालय काम करत असेल, तर ते चुकीचे आहे. सध्या शेतमालाचे उत्पादनच घटले असून, शेतातच पीक नाही तर शेतकरी काय आकाशातून भाजीपाला आणणार आहे का? बाजार समित्यांना सुटी नकोच अशी आमची नेहमी भूमिका राहिली आहे.

ज्या अडत्यांना सुटी घ्यायची त्यांनी घ्यावी, सुटीच्या दिवशी त्यांचे गाळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी द्यावेत, असे आदेश पणन संचालनालयाने काढावेत. केवळ ग्राहकहित डोळ्यांसमोर न ठेवता शेतकरीहित डोळ्यांसमोर पणन विभागाने ठेवावे. शेतकरीहितासाठी तुम्हाला पगार दिला जातो, हे विसरू नये,’’ असे श्री. पाटील म्हणाले.


इतर अॅग्रो विशेष
त्रिसदस्यीय समितीमुळेच अवकाळी भरपाईचा...सांगली (प्रतिनिधी) ः राज्य सरकारने अवकाळीने...
कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना...राहुरी विद्यापीठ, जि. नगर: महात्मा फुले कृषी...
वेळूकरांनी एकजुटीने दूर केली पाणीटंचाईसातारा जिल्ह्यातील वेळी गावाने एकजुटीने...
‘अटल योजने’द्वारे शाश्‍वत करूया भूजलजल म्हणजेच पाणी अर्थात अमृत. जलाचे वर्गीकरण आपण...
वेध भविष्यातील शेतीचाआपल्या देशात आणि राज्यात सुद्धा आजही बहुतांश...
पीकविम्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची...मुंबई  : रब्बी हंगाम २०१९ साठी विमा कंपनीची...
अठरा हजार टन कांदा आयातनवी दिल्ली : केंद्र सरकारने १८ हजार टन कांदा...
राज्यात थंडीत घट; चक्राकार वाऱ्याच्या...पुणे  ः मध्य महाराष्ट्र आणि परिसरात तसेच...
राज्यात द्राक्ष बाग नोंदणीत घट;...पुणे  ः अतिवृष्टीमुळे अनेक भागांतील द्राक्ष...
राज्यात कोल्हापूर विभागात सर्वाधिक...कोल्हापूर  : राज्यात जानेवारीच्या पहिल्या...
तब्बल २०० शेतकरी संत्रा निर्यातीसाठी...नागपूर ः संत्रा निर्यातीकरिता अपेडाकडून ऑनलाइन...
अर्थकारण उंचावण्यासाठी मोसंबीसह पेरू,...अस्मानी, सुलतानी संकटे आली तरी त्यातून मार्ग काढत...
सिंचनाची गंगा अवतरली बांधावरयवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर नोव्हेंबरमध्ये...
शेतकऱ्यांच्या व्यापक हिताचे कार्य कधी?शेती उत्पादनाची वाढ व्हावयाची असेल, वाढत्या...
निर्यातवृद्धीचा रोडमॅपभारतात प्रदेशनिहाय माती, हवामान बदलते. अनेक...
सांगलीत कृषी विभागात तब्बल २७० पदे रिक्तसांगली ः शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती...
रत्नागिरी : शेतीजमिनीतील नत्र, स्फुरद,...रत्नागिरी ः शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक...
सिद्धेश्‍वर यात्रेतील अक्षता सोहळ्याने...सोलापूर ः सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्‍वर...
गोकूळ दूध संघाकडून खरेदी दरात वाढकोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍...
थंडीत चढ-उतार पुणे ः राज्यातील अनेक भागात थंडी किंचित कमी झाली...