केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडून ॲप विकसित

कापूस उत्पादकांना तांत्रिक माहिती एका टचवर उपलब्ध होण्याकरिता ॲप विकसित केले आहे. येत्या काळात दर आठवड्याला हे ॲप अपडेट केले जाईल. त्यासोबतच गरजेनुसार त्या-त्या राज्याकरिता सल्लादेखील याॲपवर उपलब्ध असेल. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस पिकाचे व्यवस्थापन करणे सोपे होणार आहे. - डॉ. विजय वाघमारे, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.
कापूस उत्पादकांसाठी विकसित केलेले अॅप
कापूस उत्पादकांसाठी विकसित केलेले अॅप

नागपूर  ः कापूस पिकाविषयी सबकुछ सांगणारे ‘सीआयसीआर कॉटन'' नावाचे ॲप केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडून विकसित करण्यात आले आहे. सध्या इंग्रजी भाषेत असलेले हे ॲप लवकरच देशातील प्रमुख भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या सूत्रांनी दिली. 

कापूस व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत पोचलेले नाही. परिणामी, पारंपरिक पद्धतीनेच या पिकाचे व्यवस्थापन होते. त्याचा थेट परिणाम उत्पादकतेवर होऊन महाराष्ट्राची कापूस उत्पादकता देशाच्या इतर भागांच्या तुलनेत सर्वांत कमी आहे. ही बाब लक्षात घेत शेतकऱ्यांपर्यंत कापूस लागवड ते काढणीपर्यंतचे आधुनिक तंत्रज्ञान पोचावे या उद्देशाने केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडून खास ॲप विकसित  करण्यात आले आहे. गुगल प्लेस्टोरच्या माध्यमातून हा ॲप डाउनलोड करता येणार आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने कापसाचे व्यवस्थापन, लागवड अंतर, पाणी देण्याच्या पद्धती, खताच्या संतुलित आणि शिफारसीत मात्रा, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव आणि नियंत्रण यांसारख्या महत्त्वाच्या घटकांची माहिती या ॲपद्वारे  मिळविणे शक्‍य होते. 

देशाअंतर्गंत विविध राज्यांत कापसाखालील क्षेत्र, उत्पादकता याची माहिती देखील ॲपवर आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत आयोजित होणाऱ्या विविध उपक्रमांविषयी देखील या ॲपवर माहिती उपलब्ध केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणे शक्‍य होणार आहे. सद्या हे ॲप इंग्रजी भाषेत असले तरी लवकरच ते मराठी गुजराती, तेलगू, तमीळ, हिंदी भाषेतही उपलब्ध करून दिले जाणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com