agriculture news in marathi, appeal to Additional Chief Secretary for farmers producers companies problems, Maharashtra | Agrowon

शेतकरी कंपन्यांच्या मागण्यांसाठी अप्पर मुख्य सचिवांना साकडे

टीम अॅग्रोवन
रविवार, 9 सप्टेंबर 2018

अकोला : शेतकरी उत्पादक कंपन्यांना केंद्र व राज्य शासनाच्या कृषीविषयक विविध योजनांमध्ये प्राधान्य मिळावे, अशी मागणी वाशीम जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनी संघातर्फे राज्याचे कृषी व जलसंधारण खात्याचे अप्पर मुख्य सचिव एकनाथराव डवले यांच्याकडे करण्यात अाली. शनिवारी (ता. ८) श्री. डवले हे वाशीम जिल्हा दौऱ्यावर असताना शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन निवेदन दिले. 

अकोला : शेतकरी उत्पादक कंपन्यांना केंद्र व राज्य शासनाच्या कृषीविषयक विविध योजनांमध्ये प्राधान्य मिळावे, अशी मागणी वाशीम जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनी संघातर्फे राज्याचे कृषी व जलसंधारण खात्याचे अप्पर मुख्य सचिव एकनाथराव डवले यांच्याकडे करण्यात अाली. शनिवारी (ता. ८) श्री. डवले हे वाशीम जिल्हा दौऱ्यावर असताना शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन निवेदन दिले. 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अाणि राष्ट्रीय गळीत धान्य व तेलताड अभियानामध्ये बीजोत्पादन अाणि वितरणासाठी महाबीज व इतरांना घेतलेले अाहे त्याप्रमाणे शेतकरी उत्पादक कंपन्यांना हेच नियम लागू करावेत, केंद्र शासनाच्या सीड हबसाठी अनुदान मापदंडाप्रमाणे जे खासगी उद्योगांना लागू अाहेत, ते शेतकरी उत्पादक कंपन्यांना मापदंड लागू करावेत, कृषी विद्यापीठ, राष्ट्रीयकृषी संशोधनसंस्था यांच्याकडून शेतकरी उत्पादक कंपन्यांना ब्रीडर सीड मंजूर व्हावे, दहा वर्षाच्याअातील व बाहेरील ज्या वाणांच्या बियाण्याला जास्त मागणी अाहे, अशा प्रमाणित, पायाभूत बियाण्याला उत्पादन अनुदान मिळावे, बीबीएफ पेरणी तंत्रज्ञानाला शासकीय स्तरावरून पुन्हा प्रोत्साहन द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीयकृत बँका, नाबार्डकडून शेतकऱ्यांना वित्तपुरवठा करण्यासाठी सेवा सहकारी सोसायट्या पतपेढ्यांना कर्जपुरवठा केला जातो त्याच धर्तीवर शेतकरी उत्पादक कंपन्यांना वित्तपुरवठा करावा, जिल्ह्याच्या ठिकाणी कृषी मॉल उभारण्यासाठी मदत करावी, अशा प्रकारच्या विविध मागण्यांचे निवेदन वाशीम जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनी संघाचे अध्यक्ष दिलीप ना. फुके, उपाध्यक्ष पंजाबराव अवचार, सचिव विलास गायकवाड यांच्या नावे श्री. डवले यांना देण्यात अाले. 

या वेळी शेतकरी कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांनी डवले यांच्याशी मागण्यांबाबत सविस्तर चर्चाही केली. या वेळी गजानन अवचार, शिवाजी भारती, ज्ञानेश्वर ढेकळे, शेतकरी उत्पादक कंपनीचे सीईअो रवींद्र बोडखे, सुनील अोव्हर यांच्यासह इतर उपस्थित होते. 


इतर अॅग्रो विशेष
थेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर !परभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...
दुग्धव्यवसायातून शेतीला दिला सक्षम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...
मॉन्सून मालदिवात दाखल; १ जूनलाच केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत...
भारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी...कोल्हापूर: भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात...
लॉकाडाउनमध्येही शेतकऱ्यांकडून शेतमालाची...पुणे (प्रतिनिधी)ः कोरोना टाळेबंदी मध्ये शेतमालाची...
खानदेशात साठा वाढल्याने कापूस, सरकी...जळगाव : कापसाची शासकीय खरेदी खानदेशात मागील ६ मे...
राज्यातील २८० बाजार समित्या अडचणीत;...लातूर ः राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा...
उष्णतेच्या लाटेमुळे अकोल्यात केळीचे घड...अकोला  ः जिल्ह्यात या आठवड्यात वाढलेल्या...