Agriculture news in marathi; Appeal appealed during spraying | Page 2 ||| Agrowon

फवारणीदरम्यान सतर्कतेचे आवाहन
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 जुलै 2019

यवतमाळ ः फवारणीदरम्यान होणाऱ्या विषबाधा टाळण्यासाठी आवश्‍यक त्या पूरक आणि शिफारशीत उपाय योजनांचा अवलंब करण्याचे आवाहन वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाने केले आहे. जुलै ते ऑक्टोबर या काळात फवारणीचे कामे केली जातात. त्या पार्श्‍वभूमीवर हे आवाहन करण्यात आले आहे.

फवारणीदरम्यान विषबाधा होत यवतमाळ जिल्ह्यात २०१६ ते २०१७ या कालावधीत १९ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाकडून ही बाब गंभीरतेने घेत व्यापक जनजागृती करण्यात आली. त्याच्या परिणामी २०१८ मध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे शासकीय रुग्णालयाकडून सांगण्यात आले. 

यवतमाळ ः फवारणीदरम्यान होणाऱ्या विषबाधा टाळण्यासाठी आवश्‍यक त्या पूरक आणि शिफारशीत उपाय योजनांचा अवलंब करण्याचे आवाहन वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाने केले आहे. जुलै ते ऑक्टोबर या काळात फवारणीचे कामे केली जातात. त्या पार्श्‍वभूमीवर हे आवाहन करण्यात आले आहे.

फवारणीदरम्यान विषबाधा होत यवतमाळ जिल्ह्यात २०१६ ते २०१७ या कालावधीत १९ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाकडून ही बाब गंभीरतेने घेत व्यापक जनजागृती करण्यात आली. त्याच्या परिणामी २०१८ मध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे शासकीय रुग्णालयाकडून सांगण्यात आले. 

फवारणीमुळे विषबाधा ही शरीरावर फवारणीचे पाणी सांडल्यामुळे किंवा डोळ्यांमध्ये गेल्यामुळे किंवा श्‍वसनाद्वारे विषबाधा होऊ शकते. मोनोक्रोटोफॉस, प्रोफेनोफॉस, क्‍विनालफॉस, ॲसीफेट, डायमोथेएट, डायक्‍लोरोफॉस या कीडनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. फवारणी करणाऱ्या व्यक्‍तीने पायांमध्ये गमबूट, हातमोजे, तोंडावर मास्क व पूर्ण शरीर झाकेल असा कोट घालावा तसेच चष्म्याचा वापर करावा शेतात फवारणी करणाऱ्या व्यक्‍तीने मद्यप्राशन करू नये किंवा तंबाखू खाऊ नये. फवारणी करणाऱ्यांनी जेवणाच्या अगोदर हात साबणाने किंवा डेटॉलने धुवावे.

फवारणी करण्यापूर्वी पंपाची तपासणी करावी. पंप गळत असल्यास दुरुस्त करून घ्यावा, फवारणीचे मिश्रण नियमानुसार ठरवून दिल्याप्रमाणेच करावे, प्रतिबंधित केलेली कीटकनाशके व तणनाशके फवारणीसाठी वापरू नये, अशा प्रकारच्या सूचनाही शासकीय रुग्णालय प्रशासनाने केल्या आहेत. फवारणी करणाऱ्या व्यक्‍तीला कधीही मळमळ, उलटी, पातळ संडास, चक्‍कर येणे असा त्रास जाणविल्यास त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत उपचार करून घ्यावे, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार व प्रा. डॉ. बाबा येलके यांनी केले आहे. 

वर्षनिहाय विषबाधेमुळे झालेले मृत्यू 

२०१६ ०६
२०१७ १३
२०१८ शून्य

 

इतर ताज्या घडामोडी
अमेरिकन लष्करी अळीमुळे मक्याची चाळणऔरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीकडून मका पिकाला...
पुरामुळे संगमेश्वर तालुक्यातील...रत्नागिरी  ः मुसळधार पावसामुळे संगमेश्‍वर...
अधिक नफ्यासाठी शेतकरी गटांनी कापूस...अमरावती : कापूस विक्रीऐवजी गाठी तयार करून...
सांगली जिल्ह्यात महापुरामुळे ६६ हजार...सांगली : जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे...
पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांत...पुणे  : जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस...
महाबीजच्या ‘गुणवत्ता नियंत्रण’ला  राज्य...अकोला ः शिवणी येथील महाराष्ट्र राज्य बियाणे...
नांदेड जिल्ह्यात ‘शेतकरी मानधन’ची विशेष...नांदेड :‘‘जिल्ह्यातील अल्प आणि अत्यल्प भू- धारक...
तीन वर्षांपासून ‘जलयुक्त’चे पुरस्कार...नगर  ः दुष्काळमुक्तीसाठी शासनाने राबविलेल्या...
सातारा जिल्ह्यातील १३४ पाणीपुरवठा...कऱ्हाड, जि. सातारा ः महापुराने कृष्णा-कोयना या...
आमदार फोडण्याच्या नादात चंद्रकांतदादा...इस्लामपूर, जि. सांगली ः राज्यातील आमदार...
काटेमाठ खाल्ल्याने पाच जनावरे मृत्युमुखीकोपरगाव, जि. नगर  : बांधावरच्या गवतात...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात हिरव्या मिरचीला १८०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला...
अकोल्यात कृषी सहायकांचे पदोन्नतीच्या...अकोला  ः अमरावती विभागातील कृषी सहायकांच्या...
सांगलीच्या पूर्व भागातील अग्रणी कोरडीठाकसांगली  ः  सांगली जिल्ह्याच्या चार...
सातारा जिल्ह्यातील ‘मराठवाडी’च्या...ढेबेवाडी, जि. सातारा : गेल्या काही...
नगर जिल्ह्यात चार महसूल मंडळांत पावसाची...नगर : जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पावसाने...
हलक्या सरींना सुकलेल्या पिकांना...उस्मानाबाद/ लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद...
‘पोकरा’तील शेतकऱ्यांनाही मिळणार सूक्ष्म...अकोला  ः राज्यात दुष्काळाच्या झळा सहन...
राज ठाकरे यांची दिवसभर चौकशीमुंबई ः कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत...