वसंतराव नाईक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

वसंतराव नाईक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
वसंतराव नाईक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

पुसद, जि. यवतमाळ ः हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या स्मृतिदिनी दर वर्षी १८ ऑगस्ट रोजी विक्रमी उत्पादन घेणाऱ्या निवडक कर्तबगार शेतकऱ्यांचा, तसेच कृषी शास्त्रज्ञांचा शाल, श्रीफल व मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने गौरव करण्यात येतो. या वसंतराव नाईक गौरव पुरस्कारासाठी राज्यातील शेतकरी, शास्त्रज्ञांनी आपले प्रस्ताव येत्या १० जुलैपर्यंत पाठविण्याचे आवाहन वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषिभूषण दीपक आसेगावकर यांनी केले आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेश व कोकण विभागातून शेतकऱ्यांनी आपली माहिती पाठविताना प्रतिएकर घेतलेले उत्पादन, खर्च व निव्वळ नफा याबद्दल माहिती द्यावी. तसेच आपल्या शेतात कल्पकतेने आणि उद्यमशीलतेने विविध प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपला कार्यानुभव आवश्यक कागदपत्र व दोन पासपोर्ट साइज आकाराच्या छायाचित्रांसह प्रस्ताव सादर करावेत. यावर्षी कृषी शास्त्रज्ञांकरिता ''दुग्ध प्रक्रिया आणि मूल्य संवर्धन'' या विषयावरील विशेष संशोधन हा विषय निवडला असून शास्त्रज्ञांनी आपला बायोडाटा आवश्यक कागदपत्रासह सादर करावा. शास्त्रज्ञांनी इतर विषयांचा बायोडाटा पाठवू नये. पत्रव्यवहारासाठी पत्ता - कृषिभूषण दीपक आसेगावकर, अध्यक्ष वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान, श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय समोर तलाव लेआउट पुसद, जि. यवतमाळ- ४४५२०४.  अधिक माहितीसाठी प्रा. अप्पाराव चिरडे यांच्याशी ९४०४२३६२३६ या क्रमांकावर किंवा कार्यालयाशी ०७२३३-२४४२२१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com