agriculture news in Marathi appeal of sowing black rice after check facts Maharashtra | Page 2 ||| Agrowon

काळ्या भाताच्या लागवडी तथ्य तपासूनच करण्याचे आवाहन

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 जून 2021

सध्या राज्याच्या विविध भागांत अनेक शेतकरी काळ्या भाताच्या लागवडी करत आहेत. औषधी गुणधर्म असल्याने देशात प्रतिकिलोला ३०० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. 

नाशिक : सध्या राज्याच्या विविध भागांत अनेक शेतकरी काळ्या भाताच्या लागवडी करत आहेत. औषधी गुणधर्म असल्याने देशात प्रतिकिलोला ३०० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात बाजारातील मागणी व दर याबाबत मोठा गोंधळ आहे. तथ्य तपासून व खात्री करूनच शेतकऱ्यांनी काळ्या भाताची लागवड करावी, असा सल्ला कृषी विभाग व तज्ज्ञांनी दिला. 

कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यातील काही शेतकरी व गटांनी पूर्व भारतातील ‘चकाऊ’ भात बियाणे आणून लागवडीचे नावीन्यपूर्ण पीक प्रयोग केले. मात्र सोशल मीडियावर शिफारशी नसलेल्या वाणांबाबत लागवडी व फायदे सांगून दिशाभूल होत आहे. औषधी गुणधर्म असल्याबाबत दुमत नसले, तरी अधिक दर मिळत असल्याच्या वावड्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. 

भात पीकसंबंधी संशोधन केंद्रांना विचारले असता याबाबत संशोधन सुरू आहे. त्याचे अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीत. त्यामुळे येत्या काळात लागवडी वाढून उत्पादन वाढल्यास विक्रीसंबंधी समस्या उद्‍भवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एकीकडे शेतकऱ्यांची संवाद प्रक्रिया गतिमान झाल्याने देशभरातून ‘शेतकरी ते शेतकरी’ पद्धतीने अनेक पीक वाणांचे  हस्तांतर होत आहे. त्यानुसार बियाणे उपलब्ध करून लागवडी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसतो. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी विभागीय कृषी संशोधन केंद्रानेही भात उत्पादक पट्ट्यात याबाबत अद्याप पीक प्रयोग घेतलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी माहिती पडताळून वैयक्तिक जोखिमेवर लागवडी कराव्यात, असे सांगितले आहे. 

तज्ज्ञांनी काळ्या भातासंबंधी सांगितलेली तथ्ये 

  • सफेद वाणांच्या तुलनेत उत्पादकता कमी 
  • आहारात काळा भात नियमित पांढऱ्या भातासारखा घेता येत नाही. 
  • औषधी गुणधर्म आहेत, मात्र बाजारात मागणी व ग्राहक मर्यादित 
  • उत्पादन वाढून मागणी मर्यादित राहिल्यास विक्रीच्या संभाव्य अडचणी 

बियाणे विक्रीचा गोरखधंदा 
काळ्या भाताला ३०० रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याचे प्रलोभन समाजमाध्यमांवर दाखविले जात आहे. असे सांगून ४०० रुपये किलोने बियाणे विक्रीचा गोरखधंदा जोरात सुरू आहे. अनेक जण विनापरवाना बियाणे विक्री करत आहेत. मात्र असे केल्यास बियाणे कायद्याखाली गुन्हा दाखल होऊ शकतो, असेही कृषी विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे खोट्या दाव्यांवर प्रबोधन होण्याची गरज निर्माण झाली आहे. कृषी विभागाने वेळीच हस्तक्षेप केल्यास शेतकऱ्यांची फसवणूक थांबू शकेल, अन्यथा आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. 

प्रतिक्रिया
वैयक्तिक पातळीवर पीक प्रयोग करण्यास हरकत नाही, मात्र ही जोखीम शेतकऱ्यांची आहे. फसव्या दाव्यांवर विश्‍वास ठेवून कुणी लागवड करू नये. व्यावसायिक उत्पादन घेण्यास मर्यादा आहेत. पोषण मूल्य, औषधी गुणधर्म याबाबत काळ्या भातासंबंधी संशोधन सुरू आहे. पुढील पाच, सहा वर्षांत याबाबत स्पष्ट निरीक्षण समोर होईल. 
- डॉ. भारत वाघमोडे, भात विशेषज्ञ, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड 
------- 
शास्त्रोक्त पद्धतीने काळा भात लागवडीसंदर्भात शिफारशी नाहीत. शेतकरी नावीन्यपूर्ण प्रयोग म्हणून करत आहेत. मात्र थेट व्यावसायिक पद्धतीने उत्पादन घेऊ शकत नाही. लागवडी करताना उत्पादन व विक्रीचा दाव्यांवर विश्‍वास न ठेवता खात्री करून घ्या. बियाणे विक्रेत्यांकडून खरेदीच्या पक्क्या पावत्या घ्याव्यात. खोट्या दाव्यांमुळे धोका होऊ शकतो. 
- दिलीप झेंडे, संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण, कृषी आयुक्तालय 
 


इतर अॅग्रो विशेष
‘जंतर-मंतर’वर आजपासून होणार ‘किसान... नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या...
पपईचा हंगाम बहरात; फुलधारणा सुरू जळगाव : खानदेशात पपई पिकाची लागवड यंदा किंचित...
जातीवंत खिल्लार जनावरांच्या किंमतीत घट कोल्हापूर : चपळ असणाऱ्या खिलार बैलांचे संगोपन...
शेतीमालाची सड शोधणाऱ्या उपकरणाची...नाशिक : कांदे, बटाटे, आंबा यांसह विविध फळे व...
कोकणात रविवारपर्यंत जोरदार पाऊस पुणे : कोकणात जवळपास दहा ते बारा दिवसांपासून...
राज्यात सर्वदूर हलक्या सरी पुणे : कोकणातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळत...
मत्स्योत्पादन सव्वा लाख टनांवररत्नागिरी ः राज्यात गोड्या पाण्यातील...
राज्यात हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझेकोल्हापूर : यंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल्या...
राज्यात खरिपाच्या पेरण्या ८३ टक्क्यांवरपुणे  : कोकणाच्या काही भागांत...
जिद्द, चिकाटी, प्रयोगशीलतेतून...नाशिक जिल्ह्यातील सातमाने (ता. मालेगाव) येथील...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी ते कर्नाटक...
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये...पुणे : कोकणात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे धुवाधार...
अकोला कृषी विद्यापीठात ६० टक्के पदे...अकोला ः या जिल्ह्यात कृषी खात्यात कर्मचाऱ्यांची...
पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरू दे...पंढरपूर, जि. सोलापूर : पंढरपुरात पुन्हा एकदा...
निधीअभावी सिंचन विहीर योजनेला खीळ नागपूर : विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये १३ हजार...
दूध भेसळीची चर्चा डेअरी उद्योगावर संकट...पुणे ः शेतकऱ्यांच्या दुधाला कमी भाव मिळत असल्याची...
पेरा अंतिम टप्प्यात; कर्जाची प्रतीक्षा...पुणे ः राज्यात खरीप पेरा शेवटच्या टप्प्यात...
वैशिष्ट्यपूर्ण वाणांसह तंत्रज्ञान...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सोयाबीनचे...
विदर्भात जोर वाढणार पुणे : मुंबईसह, कोकणातील बहुतांश भागात मुसळधार...
कोकण, मध्य महाराष्ट्रात संततधारपुणे : कोकणातील बहुतांश भागांत पावसाचा कहर सुरू...