agriculture news in marathi, Application for 54 thousand Horticulture Plant | Agrowon

फळबाग लागवड योजनेसाठी ५४ हजार अर्ज
टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांतून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी ५४ हजार ३५९ अर्ज प्राप्त झाले आहेत. बहुतांश भागात सप्टेंबरमध्ये योजनेसाठीची सोडत झाली. शिवाय पाऊसही बेपत्ता असल्याने प्राप्त अर्जानुसार यंदा या तीनही जिल्ह्यांत फळबाग लागवड होईल का हा खरा प्रश्न आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांतून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी ५४ हजार ३५९ अर्ज प्राप्त झाले आहेत. बहुतांश भागात सप्टेंबरमध्ये योजनेसाठीची सोडत झाली. शिवाय पाऊसही बेपत्ता असल्याने प्राप्त अर्जानुसार यंदा या तीनही जिल्ह्यांत फळबाग लागवड होईल का हा खरा प्रश्न आहे.

भाउसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांतून प्राप्त झालेल्या अर्जामधून ४९ हजार ९८० हेक्‍टरवर फळबाग लागवड होणे अपेक्षित आहे. या योजनेसाठी तीनही जिल्ह्यांकरिता ११ कोटी २९ लाख रुरूपयांचा लक्ष्यांक देण्यात आला आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी औरंगाबाद जिल्ह्यातून १५ हजार ९८३ अर्ज प्राप्त झाले. ३ कोटी ६९ लाख रूपये आर्थिक लक्ष्यांक असलेल्या या जिल्ह्यात १४ हजार १३६ हेक्‍टरवर फळबाग लागवड होणे अपेक्षित आहे.

जालना जिल्ह्यातून फळबाग लागवडीसाठी २४ हजार २७० अर्ज प्राप्त झाले आहेत. २ कोटी ९९ लाख रुपये आर्थिक लक्ष्यांक असलेल्या या जिल्ह्यात २३ हजार ६६४ हेक्‍टरवर फळबाग लागवड अपेक्षित आहे.

बीड जिल्ह्यातून योजनेंतर्गत १४ हजार १०६ अर्ज प्राप्त झाले आहेत. ४ कोटी ५९ लक्ष रुपये आर्थिक लक्ष्यांक असलेल्या या जिल्ह्यातही १२ हजार १८० हेक्‍टरवर फळबाग लागवड अपेक्षित आहे. साधारणत: कोणतीही फळबाग लागवड करावयाची असल्यास जून ते जुलैदरम्यान पाऊस काळातच ती लागवड होणे अपेक्षित आहे. त्यासाठीची पूर्वतयारी मे महिन्यातच शेतकऱ्यांनी करणे अपेक्षित असल्याचे तज्ज्ञांकडून सातत्याने सांगितले जाते.

...अन्यथा फळबाग बचाव अभियान ः डॉ. ढवण
औरंगाबाद येथे पार पडलेल्या विभागीय कृषी संशोधन व सल्लागार समितीच्या बैठकीत फळबाग लागवडीसाठी प्राप्त अर्ज व लक्ष्यांकाचा विचार करता रोपांच्या उपलब्धतेवर चर्चा झाली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पुढील वर्षापर्यंत मागणीनुसार विविध फळपिकांची रोपं उपलब्ध व्हावी म्हणून गतिमान रोपनिर्मिती मोहीम हाती घेण्याचे स्पष्ट केले. हे सांगत असतानाच कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी, पडलेला पाऊस व पावसाने दिलेली ओढ पाहता कृषी विभागाने फळबाग लागवडीची अंमलबजावणी सावधगिरीने करण्याची केलेली सूचनाही महत्त्वाची मानली जात आहे. परतीच्या पावसाचीही अवकृपा राहिल्यास २०१२ प्रमाणे फळबाग बचाव अभियान राबविण्याची तयारी ठेवण्याचेही कुलगुरू डॉ. ढवण यांनी या वेळी स्पष्ट केले.

इतर बातम्या
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
मांजरपाड्याचे पाणी दरसवाडी धरणात पोचलेनाशिक : येवल्याच्या दुष्काळी भागात पाणी...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...