पाणी सर्वेक्षणासाठी पुणे विभागातील ११६ शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित

विहीर
विहीर

पुणे  ः विहीर, बोअरवेलसाठी आवश्यक भूगर्भातील पाण्याचे ठिकाणाबाबत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत शास्त्रोक्त पद्धतीने सर्वेक्षण करून दिले जाते. त्यासाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असला, तरी भूजल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. मार्च अखेरपर्यंत पुणे विभागात विहीर, बोअरवेलकरिता पाणी सर्वेक्षणासाठी ११६ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले असून या सर्व अर्ज प्रकरणांचे सर्वेक्षण प्रलंबित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भूगर्भातील पाण्याचे ठिकाण तपासण्यासाठी शेतकरी अनेकदा अनावश्यक खर्च करतात. त्यासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे विहीर, बोअरवेलसाठी लागणाऱ्या भूगर्भातील पाण्याचे ठिकाण शोधण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने सर्वेक्षण करण्याकडे शेतकरी कल आहे. गेल्या आर्थिक वर्षांत ५५७ प्राप्त अर्जापैकी २६३ ठिकाणचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना निमसरकारी अगर व्यक्‍तिगत भूजलविषयक समस्येच्या संदर्भात त्यांच्या मागणीनुसार भूजल सर्वेक्षण, भूभौतिक सर्वेक्षण करून तांत्रिक मार्गदर्शन केले जाते. अनुसूचित जाती, जमातीचे शेतकरी, दारिद्र्य रेषेखालील शेतकरी, दहा एकरांपर्यंत जिरायत शेती असणारे शेतकरी व अयशस्वी सिंचन विहीर प्रकरणे असलेल्या शेतकऱ्यांकरिता पाणी सर्वेक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. मात्र, सर्वसाधारण व्यक्ती, महिलांसाठी प्रतिप्रकरण भूभौतिक सर्वेक्षण दीड हजार रुपये व भूजल शास्त्रीय सर्वेक्षण एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येते.

भूजलशास्त्रीय सर्वेक्षणामध्ये जिल्हा वरिष्ठ कार्यालयातील भूवैज्ञानिकांमार्फत सर्वेक्षणाचे काम केले जाते. तर भूभौतिक सर्वेक्षणामध्ये भौतिक शास्त्राच्या संयंत्राद्वारे भूभौतिक तज्ज्ञांमार्फत सर्वेक्षण केले जाते. या दोन्ही पद्धती भूजल पद्धती शास्त्रीय असून भूजल उद्वभवासाठी जागा निश्चित करता येते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com