agriculture news in Marathi application process of mechanism abhiyan Maharashtra | Agrowon

यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज प्रक्रियेस प्रारंभ

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 सप्टेंबर 2020

राज्यात चालू वर्षीही कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. 

पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण ९३ कोटी ६५ लाख ३५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ‘महाडीबीटीमहाआयटी’ या शासनाच्या पोर्टलवर नोंदणी व अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागाच्या सूत्रांनी केले.

चालू वर्षी अभियानाच्या अंमलबजावणीकरिता केंद्र शासनाने सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्या http://farmech.dac.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उपअभियानाच्या केंद्र व राज्य हिस्सा ६०ः४० प्रमाणे आहे. केंद्र शासनाने कृषी अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसाहाय्यासाठी ४५ कोटी ३५ लाख, भाडे तत्त्वावर कृषी यांत्रिकीकरण सेवा सुविधा केंद्र, कृषी अवजारे बॅंक स्थापनेसाठी १५ कोटी व प्रशासकीय खर्चासाठी २ कोटी १५ लाख याप्रमाणे एकूण ६२ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. त्यासाठी केंद्र हिस्स्यापोटी अनुदानाचा ३७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसेच मागील वर्षातील केंद्र हिश्शाचा अखर्चित निधी ३६ कोटी ९ लाख रूपये पुनर्जिवित करून चालू वर्षी खर्च करण्यात मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे यांत्रिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. राज्य शासनाच्या mahadbtmahait.gov.in हे पोर्टल कार्यान्वित झाले असून शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

शेतकऱ्यांची पोर्टलवर नोंदणी व अर्ज सादर करण्याचे कार्यपद्धतीची माहिती पोर्टलवर ‘ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना या सदराखाली देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमधील सर्व कृषी अवजारे निवडीसाठी उपलब्ध राहतील. 

ट्रॅक्टरसाठी शासननिर्णयाद्वारे घोषित केल्यानुसार अनुसूचित जाती, जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक आणि महिला शेतकरी यांना किमतीच्या ५० टक्के किंवा एक लाख २५ हजार रुपये यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या ४० टक्के किंवा एक लाख रूपये यापैकी कमी असेल ते अनुदान मर्यादा राहील. इतर अवजारांसाठी मार्गदर्शक सूचनांनुसार अनुदान मर्यादा राहील, अशी माहिती कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक दिलीप झेंडे यांनी दिली.

कृषी अवजारे बॅंकेसाठी सव्वातीन कोटी
कृषी कल्याण अभियान मोहिमेअंतर्गत यांत्रिकीकरण उपअभियानामधील राज्यातील नंदुरबार, उस्मानाबाद, वाशीम व गडचिरोली या चार जिल्ह्यांतील निवडक गावांमध्ये प्रतितालुका दोन प्रमाणे कृषी अवजारे बॅंक स्थापनेसाठी अर्थसाहाय्य या घटकांच्या अंमलबजावणीसाठी ५ कोटी १२ लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. केंद्र हिस्स्यापोटी अनुदानाचा ३ कोटी २० लाख निधी उपलब्ध करून दिला आहे.


इतर अॅग्रो विशेष
पणन सुधारणा कायदे शेतकरी हिताचेच!शेतीमालाच्या मार्केटमध्ये दराच्या बाबतीत कधीही...
रिसोर्स बॅंक ः स्तुत्य उपक्रमहवामान बदलाच्या चरम सीमेवर आता आपण आहोत. खरे तर...
कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...मुंबई : कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...
‘बायोमिक्स’ विक्रीतून कृषी विद्यापीठाला...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
जरासं पहा ना साहेब, पाणीच पाणी वावरात...परभणी ः सदोष बियाण्यांमुळे दुबार, तिबार पेरणी...
परतीचा मॉन्सून राज्यातून चार दिवसांत...पुणे ः परतीच्या पाऊस सुरू असताना बंगालच्या...
कृषी कायद्यांविरोधात पंजाबकडून स्वतंत्र...चंडीगड : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा दणका पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही...
‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणारपुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले...
तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्रीसोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस...
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती पुणे ः बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश...
शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर...तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी...
कोरोनामुळे वाढल्या कृषी व्यापार संधीचीनच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची...
कृषी ‘समृद्धी’चा मार्गबाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...