पुणे जिल्ह्यात फळबाग लागवडीसाठी एक हजारांवर अर्ज दाखल

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः यंदा खरीप हंगामात फळबाग लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातून सुमारे एक हजार ४१३ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये पुरंदरमधील सर्वाधिक ३७६ शेतकऱ्यांनी अर्ज केले असून, सर्वांत कमी प्रतिसाद वेल्ह्यातून मिळाला असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी पर्यायी स्रोत निर्माण करणे, फळबाग लागवडीस चालना देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सहा मार्चपासून सुरू झाली. सुरवातीला योजनेला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद दिसून येत होता. शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी २२ एप्रिलपर्यंत मुदत होती. चालू वर्षी देण्यात येणाऱ्या लाभासाठी आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले. आलेल्या अर्जाची छाननी करून लॉटरी पद्धतीने निवड करून लाभ दिला जाणार आहे. एका कुटुंबातील एकच व्यक्तीचा अर्ज एका घटकांसाठी ग्राह्य धरण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कलमांद्वारे लागवड (अपवाद नारळ), घन लागवड, इंडो-इस्त्राईल तंत्रज्ञान, ठिबक सिंचन आदी बाबी करता येणार आहे. या योजनेअंतर्गत आंबा, डाळिंब, काजू, पेरू, सीताफळ, नारळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजीर आदी फळपिकांची लागवड करता येणार आहे. या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा कालावधी नोव्हेंबरपर्यंत राहील. त्यासाठी किमान ४३ हजार ५९६ ते कमाल १ लाख ०९ हजार ४८७ रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com