पोकरामध्ये वैयक्तिक लाभाच्या अर्जांना मंजुरी नाही 

अकोला ः कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे राज्य शासनाने अनेक योजनांच्या खर्चाला कात्री लावली आहे. असाच फटका आता राज्यात १५ जिल्ह्यांत राबविल्या जात असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा (पोकरा)ला बसला आहे. प्रकल्पाअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही अर्जांना पूर्वसंमती देऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत.
Applications for personal benefits are not allowed in Pokra
Applications for personal benefits are not allowed in Pokra

अकोला ः कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे राज्य शासनाने अनेक योजनांच्या खर्चाला कात्री लावली आहे. असाच फटका आता राज्यात १५ जिल्ह्यांत राबविल्या जात असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा (पोकरा)ला बसला आहे. प्रकल्पाअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही अर्जांना पूर्वसंमती देऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. 

कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या उपाययोजनांचा परिणाम राज्याच्या आर्थिक स्थितीवर झाला आहे. परिणामी विकास कामांना, विविध खर्चांना तातडीने थांबविण्यात आले आहे. याचाच फटका पोकराच्या लाभार्थ्यांनाही आता झेलावा लागणार आहे. बुधवारी (ता. सहा) पोकराचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी तातडीचे पत्र काढत प्रकल्पाअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही अर्जांना ६ मेपासून पूर्वसंमती देऊ नये असे निर्देश दिले. 

सोबतच ज्या मृद व जलसंधारण कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे पण कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाहीत, त्या कामांना यानंतर कार्यारंभ आदेश देऊ नयेत असे सुचविले. पोकरात तिसऱ्या टप्प्यात निवडलेल्या गावांमध्ये या खरीप हंगामात नियोजित केलेल्या शेतीशाळांमध्ये प्रमुख पिकाच्या दोन ऐवजी एकच शेतीशाळा घेण्यात यावी, असे सांगितले आहे. 

विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खानपान पट्ट्यातील गावांमध्ये जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने चार हजार कोटी रुपये खर्चाचा हवामान अनुकूल कृषी प्रकल्प राबविला जात आहे. निवड केलेल्या १५ जिल्ह्यातील ५१४२ गावांमध्ये सन २०१८-१९ ते २०२३-२४ या सहा वर्षात प्रकल्प राबविला जात आहे. 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविला जात असलेले जिल्हे ःविदर्भ- अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा, वाशीम, यवतमाळ. मराठवाडा- औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, खानदेश- जळगाव. 

प्रकल्पात निवडलेली जिल्हानिहाय गावे  अकोला ४९८, अमरावती ५३२, औरंगाबाद ४०६, बीड ३९१, बुलडाणा ४४१, हिंगोली २४०, जळगाव ४६०, जालना ३६३, लातूर २८२, नांदेड २८४, उस्मानाबाद २८७, परभणी २७५, वर्धा १२५, वाशीम १४९, यवतमाळ ३०९, एकूण ५१४२   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com