परभणी जिल्ह्यातील २८ मंडळांत फळपीक विमा लागू

परभणी जिल्ह्यातील २८ मंडळांत फळपीक विमा लागू
परभणी जिल्ह्यातील २८ मंडळांत फळपीक विमा लागू

परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०१९-२० मध्ये मृग बहरासाठी लिंबू, संत्रा, मोसंबी, पेरू या फळपिकांसाठी लागू आहे. जिल्ह्यातील २८ मंडळांतील फळपिकांचा यामध्ये समावेश आहे. संत्रा, लिंबू, पेरू या पिकांचे विमा प्रस्ताव दाखल करण्यासाठी शुक्रवारी (ता. १४), मोसंबीसाठी १ जुलैपर्यंत अंतिम मुदत आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

जिल्ह्यातील संत्रा आणि मोसंबी फळपिकांसाठी प्रत्येकी १२ मंडळे, लिंबांसाठी १ आणि पेरूसाठी ३ मंडले असे एकूण २८ मंडलांत ही योजना लागू आहे. मोसंबी आणि संत्रा पिकासाठी प्रतिहेक्टरी ३ हजार ८५० रुपये, पेरूसाठी प्रतिहेक्टरी २ हजार ७५० रुपये, लिंबूसाठी ३ हजार ३०० रुपये विमा हप्ता आहे.

संत्रा, पेरू आणि लिंबूसाठी प्रस्ताव बँका, आपले सरकार सेवा केंद्रातर्फे ऑनलाइन अर्ज सादर करता येतील. 

योजनेत समाविष्ट मंडळे

लिंबू दैठणा
संत्रा जांब, पेडगाव, पाथरी, जिंतूर, सावंगी म्हाळासा, चुडावा, कात्नेश्वर, ताडकळस, लिमला, सेलू, मानवत, कोल्हा
मोसंबी परभणी, झरी, पाथरी, हदगाव, मानवत, केकरजवळा, कोल्हा, सेलू, वालूर, जिंतूर, चुडावा, लिमला
पेरू परभणी, झरी, वालूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com