नाशिक : खरीप पीकविमा योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करा

नाशिक : पंतप्रधान पीकविमा योजनेच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी केले आहे.
Apply for Kharif Crop Insurance Scheme
Apply for Kharif Crop Insurance Scheme

नाशिक : पंतप्रधान पीकविमा योजनेच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी केले आहे.

पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी शासन निर्णयानुसार २०२०-२१ ते २०२२-२३ या तीन वर्षांसाठी एकच शासन निर्णय लागू करण्यात आला आहे. या तीन वर्षांच्या कालावधीत खरीप व रब्बी हंगामातील पिकांकरिता नाशिक जिल्ह्यासाठी भारती अॅक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी ही एकच विमा कंपनी नेमण्यात आली आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रमुख अन्नधान्य, गळीत धान्य आणि नगदी पिकांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे.

रब्बी हंगाम २०२०-२१ साठी पुढील पिकांकरिता रब्बी ज्वारी ३० नोव्हेंबर तसेच गहू, हरभरा, कांदा व इतर पिके १५ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या विमा हप्त्याचा भार कमी व्हावा यासाठी खरीप हंगामासाठी विमा हप्ता २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ तर नगदी पिकांसाठी ५ टक्के असणार आहे. कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ही योजना ऐच्छिक असून, कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेस व पतपुरवठा करणाऱ्या संस्थेस कळविणे बंधनकारक असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

असे असणार पीक विम्याचे संरक्षण पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, भूस्खलन, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट जोखमीच्या बाबींमध्ये समाविष्ट केलेली आहे. हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान (फक्त खरीप हंगामासाठी) पिकांची काढणीपश्चात होणारे नुकसान तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानासाठी ही पीक विम्याचे संरक्षण मिळणार आहे.

हंगामनिहाय पिके अशी खरीप हंगाम : भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडिद, भुईमूग, सोयाबीन, कारळे, कापूस, खरीप कांदा. रब्बी हंगाम : गहू, ज्वारी, ज्वारी, हरभरा, उन्हाळी भुईमूग, रब्बी कांदा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com