Agriculture news in Marathi Apply for Kharif Crop Insurance Scheme | Page 2 ||| Agrowon

नाशिक : खरीप पीकविमा योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

नाशिक : पंतप्रधान पीकविमा योजनेच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी केले आहे.

नाशिक : पंतप्रधान पीकविमा योजनेच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी केले आहे.

पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी शासन निर्णयानुसार २०२०-२१ ते २०२२-२३ या तीन वर्षांसाठी एकच शासन निर्णय लागू करण्यात आला आहे. या तीन वर्षांच्या कालावधीत खरीप व रब्बी हंगामातील पिकांकरिता नाशिक जिल्ह्यासाठी भारती अॅक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी ही एकच विमा कंपनी नेमण्यात आली आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रमुख अन्नधान्य, गळीत धान्य आणि नगदी पिकांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे.

रब्बी हंगाम २०२०-२१ साठी पुढील पिकांकरिता रब्बी ज्वारी ३० नोव्हेंबर तसेच गहू, हरभरा, कांदा व इतर पिके १५ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या विमा हप्त्याचा भार कमी व्हावा यासाठी खरीप हंगामासाठी विमा हप्ता २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ तर नगदी पिकांसाठी ५ टक्के असणार आहे. कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ही योजना ऐच्छिक असून, कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेस व पतपुरवठा करणाऱ्या संस्थेस कळविणे बंधनकारक असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

असे असणार पीक विम्याचे संरक्षण
पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, भूस्खलन, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट जोखमीच्या बाबींमध्ये समाविष्ट केलेली आहे. हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान (फक्त खरीप हंगामासाठी) पिकांची काढणीपश्चात होणारे नुकसान तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानासाठी ही पीक विम्याचे संरक्षण मिळणार आहे.

हंगामनिहाय पिके अशी
खरीप हंगाम : भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडिद, भुईमूग, सोयाबीन, कारळे, कापूस, खरीप कांदा.
रब्बी हंगाम : गहू, ज्वारी, ज्वारी, हरभरा, उन्हाळी भुईमूग, रब्बी कांदा.


इतर बातम्या
बाजार समित्यांपुढे स्पर्धेचे आव्हान पुणे ः केंद्र सरकारच्या ‘एक देश, एक बाजार'...
धक्कादायक, सरकारी समित्यांमध्ये ...पुणे: पीकविमा योजनेसहित कृषी योजने संबंधित सर्व...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलक्या...पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील पावसाचा...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सर्व शेतीमाल संपूर्ण नियमनमुक्त ! ‘एक...पुणे ः सर्व शेतीमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
कोरोनाच्या संकटातही गुळाचा गोडवा कायमकोल्हापूर : महापुराच्या तडाख्यात सापडूनही सरत्या...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
आदिवासी तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ...नाशिक: कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्याचे...
शेतकरीविरोधी कायद्यावर ‘किसानपूत्र’चे...औरंगाबाद: किसानपूत्र आंदोलनाच्यावतीने...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
कोल्हापुरात नद्यांच्या पाण्यात वाढ...कोल्हापूर: जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच...
शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करा मुंबई: केंद्र सरकारने ५ जून २०२० रोजी काढलेले...
राज्यात पावसाचा जोर सोमवारपासून वाढणार पुणे ः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
किसान रेल्वेला नाशिकमधून प्रारंभ नाशिक: केंद्र सरकारने २०२० च्या अर्थसंकल्पात...
नाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी किसान...नाशिक: कृषी क्षेत्रात प्रगत असलेल्या नाशिक...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...
नंदुरबारमध्ये अनेक भागात पाऊस नंदुरबार ः जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...