Agriculture news in marathi Apply for kharif irrigation application, deadline is August 27 | Agrowon

नाशिक : खरिपासाठी सिंचनाचे मागणी अर्ज द्या, २७ ऑगस्टपर्यंत मुदत

टीम अॅग्रोवन
रविवार, 23 ऑगस्ट 2020

नाशिक : अन्नधान्य, कडधान्ये व तेलबिया पिके, यांना पाणी पुरवठा आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी पाणी अर्ज २७ ऑगस्टपर्यंत नजीकच्या सिंचन शाखा कार्यालयात दाखल करावे.

नाशिक : चालू खरीप हंगामासाठी विहिरीवरील उभी पिके व पेरणी झालेली पिके ज्यामध्ये अन्नधान्य, कडधान्ये व तेलबिया पिके, यांना पाणी पुरवठा आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी पाणी अर्ज २७ ऑगस्टपर्यंत नजीकच्या सिंचन शाखा कार्यालयात दाखल करावे. त्याची पोच घेण्याचे आवाहन नाशिक पाटबंधारे विभाग उपकार्यकारी अभियंता अ. रा. निकम यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील इगतपुरी, त्र्यंबेकश्वर, दिंडोरी,नाशिक व सिन्नर या तालुक्यातील लघुप्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या वर्षी धरणात पावसाच्या पाण्याने नवीन पाण्याचा साठा उपलब्ध होईल; त्यासाठी नियोजनानुसार उपलब्ध होणाऱ्या पाण्यात तेलबिया आणि चारा या पिकास प्राधान्य असेल. तरीही पाण्याची उपलब्धता विचारात घेऊनच निर्णय देण्यात येईल. ज्या तलावांवर पाणी उपलब्धतेपेक्षा जास्त मागणी आली असल्यास त्या ठिकाणी मागणी क्षेत्रात समप्रमाणात कपात करुन मंजुरी देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी पाणीवापर करताना ठिबक, तुषार, सूक्ष्म सिंचनावर भर द्यावा. पाटमोटसंबंध तसेच जास्त लांबणीवरील क्षेत्राची जास्त मागणी येत असल्यास तेथे पाणी पुरवठा करण्याचे अथवा नाकारण्याचे अधिकार क्षेत्रीय परिस्थितीनुसार संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांना असणार आहेत. थकबाकी व काळ्या यादीत ज्यांचे नावे आहेत, त्यांना मंजुरी दिली जाणार नाही. नमुना क्रमांक.७ च्या आधारे ज्यांना पाण्याचा लाभ घ्यायचा असल्यास अर्जासोबत वैध सातबारा उतारा जोडणे बंधनकारक आहे. 

कालवा, जलाशय, नदी व नाले यावर नमुना नं. ७ भरुन मंजुरी असणाऱ्या धारकांव्यतिरिक्त कुणीही इलेक्ट्रिक मोटारी अथवा ऑईल इंजिन ठेवून पाणी घेण्याचा प्रयत्न करु नये. तसे निदर्शनास येताच संबंधितावर सिंचन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल.

संबंधित लघु प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध न झाल्यास अथवा कमी झाल्यास, दिलेले परवाने रद्द करण्यात येतील; याबाबत भरपाई मिळणार नाही. तसेच न्यायालयात दावा दाखल करता येणार नसल्याची माहिती देखील शासकीय प्रसिद्धीपत्रकात दिली आहे, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभाग उपकार्यकारी अभियंता अ. रा. निकम यांनी केले.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
भारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...
मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...