Agriculture news in marathi, Apply online for Orchard Ambia Deaf | Agrowon

`फळबाग आंबिया बहरासाठी ऑनलाइन अर्ज करावेत `

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 ऑक्टोबर 2021

नाशिक : ‘‘राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेअंतर्गत (आंबिया बहार) २०२१-२२ साठी जिल्ह्यातील डाळिंब, काजू, केळी, द्राक्ष व आंबा या पिकाचा समावेश करण्यात आला.

नाशिक : ‘‘राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेअंतर्गत (आंबिया बहार) २०२१-२२ साठी जिल्ह्यातील डाळिंब, काजू, केळी, द्राक्ष व आंबा या पिकाचा समावेश करण्यात आला. त्या अनुषंगाने या विमा संरक्षणचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत’’, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले.

‘‘पंतप्रधान फळपीक विमा योजना संरक्षणासाठी देण्यात येणारी रक्कम सहकार विभागाने मंजूर केलेल्या कर्ज दराएवढी निर्धारित करण्यात आली आहे. या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी लाभ घेणे ऐच्छिक आहे. पीक संरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सादर करावयाचा अर्ज व विमा हप्ता कॉमन सर्व्हिस सेंटरतर्फे ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील, याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी’’, असेही सोनवणे यांनी कळविले.

योजनेसाठी नाशिक जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. महसुल मंडळात स्थापन केलेल्या महावेध प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे ग्राह्य धरण्यात येणाऱ्या प्राप्त आकडेवारीतील तरतुदीनुसार  नुकसान भरपाई देण्यात येईल. या योजने संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर देण्यात आला आहे.


इतर बातम्या
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
‘दूधगंगा वेदगंगा’ एकरकमी ३०५६ रुपये...कोल्हापूर : ‘‘बिद्री (ता. कागल) येथील श्री...
वऱ्हाडात सोयाबीनची बाजारात हजारो...अकोला ः वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमध्ये...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
उसाच्या तोडणीला कोल्हापुरात सुरुवातकोल्हापूर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
नांदेडमध्ये ‘रयत क्रांती’कडून शासन...नांदेड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
हिरापुरात कापसाची पाण्यातच वेचणीपारोळा, जि. जळगाव : खरीप हंगामाच्या वेळी पावसाने...
मालेगाव तालुक्यात ऊस जळून खाककळवाडी, ता. मालेगाव : तालुक्यातील नरडाणे...
पुणे जिल्ह्यात रब्बीचे अडीच लाख हेक्टर...पुणे  ः ‘‘सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे....
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी...वाशीम : जिल्ह्यात २६ व २७ सप्टेंबर आणि २ व १७...
नांदेड जिल्ह्यात पीकविमा भरपाईची...नांदेड : अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्‌भवून सहा लाख...
निर्यात पडतळमुळे सोयाबीन दराला आधारपुणे : देशात सोयापेंडचे दर अधिक होते त्यामुळे...
राज्याच्या तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानात...
हडपलेला शेतकरीवाटा जमा करण्यासाठी नोटिसापुणे ः राज्यात शेती अवजारे न वाटताच कोट्यवधी...
शेतकरी आंदोलक नव्या रणनीतीच्या तयारीतनवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांविरोधातील १०...
बुलडाण्यात ८९ हजार हेक्टर बाधितबुलडाणा : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात तीन दिवस...