टंचाई निवारणार्थ उपाययोजना राबवा : डॉ. दीपक म्हैसेकर

टंचाई निवारणार्थ उपाययोजना राबवा : डॉ. दीपक म्हैसेकर
टंचाई निवारणार्थ उपाययोजना राबवा : डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे : पावसाच्या कमतरतेमुळे यंदा पुणे विभागात पाणीटंचाईचे तीव्र संकट निर्माण झाले आहे. टंचाईचा सामना करण्यासाठी या कामांना वेग देणे आवश्यक आहे. टंचाई निवारणार्थ तातडीच्या उपाययोजना राबवून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.

विभागातील टंचाई आढावा बैठक शुक्रवारी (ता. ३) डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत टंचाई निवारणासाठी जिल्हानिहाय करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड, साताऱ्याचे कैलास शिंदे, कोल्हापूरचे अमन मित्तल, सांगलीचे प्रभारी विक्रांत बगाडे, महसूल उपायुक्त प्रताप जाधव, सामान्य प्रशासन उपायुक्त संजयसिंह चव्हाण या वेळी उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘‘पावसाच्या कमतरतेमुळे यावर्षी पाण्याची मोठी समस्या आहे. विभागातील ६७७ गावे व ४२५८ वाड्यावस्त्यांवरील १२ लाख ३८ हजार २५० लोक, ३ लाख ७२ हजार ८४४ पशुधन बाधीत आहे. ही संख्या खूपच मोठी असून, ४३ शासकीय व ७६१ खासगी अशा मिळून ८०४ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पुणे विभागात टंचाईचा सामना करण्यासाठी नवीन विंधन विहिरी घेणे, नळपाणी योजनांची विशेष दुरुस्ती करणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती करणे, नगरपालिका हद्दीतील प्रगतिपथावरील योजना शीघ्रगतीने पूर्ण करणे, तात्पुरत्‍या पूरक नळ पाणीपुरवठा योजना करणे, विहिरी खोल करणे, त्यांच्यातील गाळ काढणे आदी उपायोजना करण्यात येत आहेत. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना आणि त्यांच्या पशुधनाला दिलासा देण्यासाठी विशेष उपायोजना करण्याच्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.

सोलापूर सर्वाधिक बाधित

विभागातील सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक २११ गावे, तर १४१० वाड्या वस्त्या बाधित आहेत. सातारा जिल्ह्यात ३ लाख १८ हजार ६५८ आणि सांगली जिल्ह्यातील ५४ हजार १८६ पशुधनाला टॅंकरने पाणी द्यावे लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com