agriculture news in marathi "Apply for schemes under MahaDBT" | Agrowon

‘‘महाडीबीटी’अंतर्गत योजनांसाठी अर्ज करावेत’

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 जानेवारी 2021

नांदेड : ‘‘विविध योजनांसाठी शेतकऱ्यांनी १५ जानेवारीपर्यंत अर्ज करावेत,’’ असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले.

नांदेड : ‘‘कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर माहितीसह अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यात जिल्ह्यात ३१ डिसेंबरपर्यंत १९ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. मागील काही वर्षाच्या तुलनेत अर्जाची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे. विविध योजनांसाठी शेतकऱ्यांनी १५ जानेवारीपर्यंत अर्ज करावेत,’’ असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले.  

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्यासाठी अर्ज करण्यापासून ते लाभ मिळेपर्यंत संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. अर्ज दाखल करताना कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. एकावेळी लॉगीन केल्यानंतर वेगवेगळ्या बाबींसाठी अर्ज करता येतात.

अर्जासाठी केवळ २३ रुपये ६० पैसे शुल्क आहे. परंतु जिल्ह्यातील शेतकरी संख्या पाहता अर्जाचे प्रमाण अत्यल्प आहे. जिल्ह्यात ३१ डिसेंबरपर्यंत केवळ १९ हजार अर्ज दाखल झाले. सर्वाधिक साडेदहा हजार अर्ज सिंचन सुविधेसंदर्भातील असल्याची माहिती तंत्र अधिकारी (विस्तार) वैभव लिंगे यांनी दिली.

बाबनिहाय अर्ज संख्या

बैल चलित अवजारे - ९१८, पॉवर टिलर - १,२५३, कृषी अवजारे बॅंक - ६३, ट्रॅक्टर - ६,०८१, टॅक्टर चलित अवजारे - ७,७६१, विशेष कृषी यंत्र - १५३, प्रक्रिया उद्योग - ४९५, ड्रिप इरिगेशन - ३,४४९, वैयक्तीक शेततळे - ३०८, पाइप - १,६८२, पंपसेट - १,१५५, स्प्रींकलर इरिगेशन ४,०४६. 
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केला नाही, त्यांनी १५ जानेवारीपर्यंत अर्ज भरावे. 
- रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.


इतर बातम्या
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
ढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...